अवकाळी पाऊस आणि गारपीठ यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निर्सगाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमी संकटात सापडतो. खरीप हंगामातील पीके अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने हजेरी लावली होती. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शेतकऱ्यांनी काढलेल्या विम्याची रक्कम (Crop Insurance) त्वरीत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. पीक पाहणी, पंचनामे आणि नंतर दीपावलीमध्ये भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. या दरम्यान, 75 टक्केच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती आता उर्वरीत रक्कमही शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेतकऱ्यांचे दावे केल्यानंतर पहिल्या टप्प्यात 75 टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. तर उर्वरीत 25 टक्के निधी पुढील टप्प्यात जमा करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या :
शेतकरी संतापला! थेट मार्केटच केले बंद, जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण?
Kisan Credit Card: शेतकरी शेतीव्यतिरिक्त "या" कामांसाठी KCC कडून कर्ज घेऊ शकतो
नांदेड जिल्हाभरातील शेतकऱ्यांना उर्वरीत रकमेचा फायदा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. खरीप हंगामाचा नैसर्गिक आपत्ती घटका अंतर्गत सुरुवातीला 461 कोटींचा पीकविमा मंजूर झाला होता.
आता 331 कोटी रुपये पिकविम्यासाठी मंजूर झाले आहेत. काही दिवसांमध्येच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. याकरिता पुन्हा सर्वकाही प्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही विमा कंपन्याकडून पूर्तता होताच निधीचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
PM Kisan Samman Nidhi: 11 व्या हप्त्यासाठी, लाभार्थी यादीतील नाव "या" प्रमाणे तपासा
Share your comments