आधारभूत किंमतीने धान्याची विक्री करता यावी म्हणून नाफेडच्या माध्यमातून सरकार शेतीमालाची खरेदी करीत असते. सध्या तूर आणि हरभऱ्याच्या खरेदीसाठी असे केंद्र उभारण्यात आली आहेत. कृषी विभागाने जाहीर केलेल्या द्वितीय आगाऊ अंदाजामुळे हरभऱ्याच्या उत्पादनाचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार प्रति शेतकरी हरभऱ्याची खरेदी शक्य आहे.
उत्पादन क्षेत्र वाढूनही आता शेतकऱ्यांना खरेदी केंद्राचा आधार घेता येणार आहे. सध्या हमीभावापेक्षा बाजारपेठेतील दर हे कमी आहेत, त्यामुळे या केंद्राचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. पण त्यापुर्वी शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर पिकाची नोंदणी करणे गरजेचे आहे.
यावर्षी हरभऱ्याचे क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे हरभरा खरेदीचे नियोजन कसे केले जाणार हा मोठा प्रश्न होता.
अखेर कृषी विभागाने उत्पादकतेमुळे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रति शेतकरी हरभऱ्याची खरेदी करावे, असे आदेश पणन महासंघाने दिले आहेत. खरेदी केंद्राच्या माध्यमातून राज्यातील 6 लाख 89 हजार टन हरभऱ्याची खरेदी करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे. राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये ही खरेदी केंद्र उभारण्यात आलेली आहेत. शिवाय नोंदणीनंतर आता 1 मार्चपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरूवात झाली आहे.
नाफेडच्यावतीने उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर 5 हजार 230 असा दर ठरवून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे खुल्या बाजारपेठेत सध्या 4 हजार 200 ते 4 हजार 4 हजार 700 असा दर आहे. त्यामुळे खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना चांगला आधार मिळणार आहे.
राज्यातील हरभऱ्याची अंदाजित उत्पादकता
दरवर्षी पीक कापणीपूर्वी कृषी विभागाकडून उत्पादकता ठरवली जाते. त्यानुसार पीकाचे नियोजन केले जाते. उत्पादकता ही क्विंटलमध्येच मोजली जाते. यामध्ये परभणी : 8.20, हिंगोली :11.00, नांदेड : 11.50, लातूर : 13.50, उस्मानाबाद: 6.5, बीड: 9.5, जालना:13.00, औरंगाबाद: 5.80, बुलडाणा: 11.80, अकोला : 15.00, वाशिम : 7.00, यवतमाळ: 12.00, अमरावती: 15.60, नागपूर : 15.00, भंडारा: 8.00, गोंदिया: 8.10, चंद्रपूर: 7.50, गडचिरोली 4.7, नाशिक: 9.50, धुळे 10.97, नंदूरबार: 13.96, जळगाव: 13.00, नगर: 7.5, पुणे : 8.60, सोलापूर:6.50, सातारा : 9.25, सांगली: 11.6, कोल्हापूर : 12.00, ठाणे 7.10, पालघर:7.50, रायगड: 4.50 तर रत्नागिरी 4.90 अशी उत्पादकता आहे.
Share your comments