भारत हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या शेती व्यवसाय आणि शेती संलग्न व्यवसाय यावर अवलंबून आहे तसेच शेती येथील लोकांचा मुख्य आणि प्रमुख व्यवसाय आहे. याचरोबरीने शेतीबरोबर पशुपालन, दुग्ध्यवसाय, मत्स्य व्यवसाय, शेळीपालन यासारखे जोडव्यवसाय करून शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
शेतकरी वर्गावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता असते. कधी निसर्गामध्ये होणारी पिकाची हानी, अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई, वादळी वारे यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होते परंतु बऱ्याच वेळा शेतकरी वर्गाला खते योगी नाही मिळाली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेती करायची म्हंटले की सर्वात महत्वाचे म्हणजे मुबलक पाणी, योग्य मृदा, आणि खते.
रासायनिक खतांचा वापर:-
कमी वेळात शेतीतून बक्कळ नफा मिळवायचा असेल तर रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या रासायनिक खतांमुळे कमी वेळात अधिक उत्पन्न मिळते शिवाय पीक सुद्धा चांगले येते. सध्या शेतीमध्ये रासायनिक खतांचे प्रमाण वाढले असले तरी लवकरात लवकर परिणाम दाखवत असल्यामुळे रासायनिक खतांकडे शेतकरी वर्गाचा कल वाढत चालला आहे.
रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा:-
यंदा च्या वर्षीचा खरीप हंगाम संपत आला आहे परंतु ऐन रब्बी हंगामाच्या तोंडाला खतांचा तुटवडा झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. योग्य वेळी पिकांना खत नाही मिळाले तर उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होत शिवाय नुकसान ही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. राज्यातील एकट्या अकोला तालुक्यात रब्बी हंगामाच्या सुरुवातीसच तब्बल 71 हजार मॅट्रिक खतांची मागणी आहे परंतु सध्या 12 हजार मेट्रिक खत उपलब्ध आहे. त्यामुळे ऐन हंगामाच्या काळी खतांमध्ये तुटवडा होताना दिसत आहे.
शेतकरी वर्गावर संकटाची मालिका:-
शेतकरी वर्गावर नेहमी संकटाची मालिका सुरूच असते कधी होणारे नुकसान तरी पिकाला योग्य बाजारभाव न मिळणे हे चालूच असते परंतु ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहेत. जर का योग्य वेळी खतांचा पुरवठा न झाल्यास शेतीमधील उत्पन्न घटेल. त्यामुळे शेतकरी वर्गाची डोकेुखी जास्तच वाढत आहे.
Share your comments