भारत हा कृषिप्रधान देश आहे देशातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेती व्यवसाय करून आपले जीवन जगत आहे. सध्या शेतीमध्ये अनेक अमुलाग्र बदल घडून आले आहेत त्यामुळे शेतीव्यवस्थेमध्ये आणि पीक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. या बदलामागे अनेक कारणे आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तंत्रज्ञान.सध्या शेतीच्या सर्वच कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. बहुतांशी शेतीची कामे ही वेगवेगळ्या अवजारांची च होत आहे.
तंत्रद्यानाच्या वापरामुळे शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढणार :
पारंपरिक पद्धतीने शेती कमी पप्रमाणात होत चालली आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने शेतीमधील बरीच कष्टची कामे कमी झाली आहेत. यंत्राच्या वापरामुळे शेतीमधील कामे झटपट होऊ लागली आहेत शिवाय शेतीमधून उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे.तंत्रद्यानाच्या वापरामुळे शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढून यातून त्यांना बक्कळ नफा सुद्धा मिळत आहे. शिवाय तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने शेतीमधील कामासाठी लागणाऱ्या मजुरांनाचा खर्च सुद्धा कमी झाल्यामुळे तंत्रज्ञान शेतीसाठी फायदेशीर ठरत चालले आहे.
शेतकरी वर्गाला शेतीमधून आर्थिक सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित करण्याची हमी कृषी विद्यापीठाने सुद्धा दिली आहे शिवाय शेतकरी बांधवांना शेतीमधून आर्थिक सक्षम बनवेल असे विधान सुद्धा सुनील केदार यांनी केले आहे.तसेच ही शेतकरी वर्गासाठी कार्यशाळा मंजूर करण्यात आली होती. ही कार्यशाळा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संयुक्त सहकार्याने वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेमध्ये पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. चारुदत्त मायी, कापूस विकास संचालनालयाचे डॉ. ए. एल. वाघमारे, नागपूर विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, ‘पंदेकृवि’चे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा सुद्धा सहभाग होता. यांच्या सर्वांच्या सहकार्याने या कार्यशाळेत शेतकरी वर्गाला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील शिवाय शेतकरी वर्गाच्या अनेक अडचणी आणि त्याचे निवारण आणि शेतीमधील उत्पन्न वाढ यावर चर्चा झाली.
Share your comments