पीएम किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भारत सरकारद्वारे सुरु करण्यात आली होती. या योजनेद्वारे देशातील सुमारे अकरा कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा निधी दिला जातो. वार्षिक सहा हजार रुपये या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा एक हफ्ता आशा तीन हप्त्यात बँक खात्यावर जमा केले जातात.
महाराष्ट्रातील सुमारे एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेचे आतापर्यंत दहा हफ्ते पात्र शेतकर्यांना देण्यात आले आहेत. पीएम किसानचा दहावा हफ्ता (Tenth installment of PM Kisan) नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजे एक जानेवारीला देण्यात आला, भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी (Prime Minister Hon'ble Narendraji Modi) यांच्या हस्ते हा दहावा हफ्ता वितरित करण्यात आला. भारत सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेद्वारे पात्र शेतकर्यांना स्वस्त दरात कर्ज देखील उपलब्ध करून देते.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारत सरकारने पीएम किसान सम्मान निधि योजना आणि किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) यांना लिंक केले आहे. म्हणजे जे शेतकरी पीएम किसान सम्मान निधि योजना साठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड ताबडतोब मिळून जाईल आणि अशा शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे अगदी माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे तीन लाख रुपयांचे कर्जत परवडणाऱ्या दरात दिले जाते. या कर्जाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे कर्ज कुठलीही बँक विना हमी शेतकऱ्यांना देत असते.
तीन लाख रुपयांचे कर्ज अल्प मुदत असलेले कर्ज किसान क्रेडिट कार्डद्वारे 9 टक्के व्याज दराने दिले जाते. मात्र या कर्जासाठी भारत सरकार द्वारे व्याजासाठी दोन टक्के सबसिडी (Subsidy) देण्यात आली आहे तसेच या कर्जाची वेळेत परतफेड केली तर शेतकरी बांधवांना व्याज दरात तीन टक्के सूट दिली जाते. म्हणजे जर शेतकरी बांधवांनी वेळेत परतफेड केली तर अवघ्या चार टक्के व्याजदर शेतकऱ्यांकडून आकारण्यात येतो. मात्र कर्ज फेडीला विलंब झाल्यास शेतकऱ्यांकडून सात टक्के दराने कर्ज वसूल केले जाते.
Share your comments