शेतकरी कधी काय करतील याचा अंदाज भल्या भल्यांना लावता येत नाही. आता राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये एका शेतकऱ्याच्या मुलाने घराच्या छतावर ३३ वर्षांचा जूना ट्रॅक्टर लावला आहे. अनुपगड तहसीलच्या रामसिंगपूर भागात राहणाऱ्या अंग्रेज सिंह यांनी ६ लाख रुपये खर्चून ट्रॅक्टरची डेंटिंग-पेंटिंग करून घेतली आहे. त्यानंतर मोठ्या क्रेनच्या साहाय्याने हा ट्रॅक्टर छतावर ठेवण्यात आला. यामुळे परिसरात सध्या याची चर्चा सुरु आहे. हा ट्रॅक्टर लांबूनही दिसत आहे. त्याला बघण्यासाठी घरी जाण्याची देखील गरज नाही.
शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी हे कृत्य केल्याचे अंग्रेज सिंह यांनी केले आहे. शेतकऱ्याच्या मुलाने हे ट्रॅक्टर त्याच्या घरावर लावण्यात आले आहे. एका एनआरआय शेतकऱ्याने त्याच्या नवीन बांधलेल्या घरात स्थलांतरित होण्यापूर्वी क्रेनच्या मदतीने घराच्या तिसऱ्या मजल्यावर ट्रॅक्टर ठेवले आहे. त्यामुळे या ट्रॅक्टरची गावभरातच नाही, तर देशभरात चर्चा होत आहे. अनेकजण त्यांचे हे घर बघण्यासाठी लांबून येत आहेत. यामुळे याचे फोटो व्हायरल होत आहेत.
त्यांनी ६ लाख रुपये किमतीचा ३३ वर्षे जूना ट्रॅक्टर विकत घेतला आणि तासाभराच्या प्रयत्नानंतर आधुनिक क्रेनच्या साहाय्याने नवीन बांधलेल्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर ठेवला. तसेच ट्रॅक्टर खराब होऊ नये, यासाठी रिमोटच्या साहाय्याने तो दररोज सुरु करण्यात येणार आहे. यामुळे तो कधी बंद देखील पडणार नाही. ट्रॅक्टर हा शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा ट्रॅक्टर पूजनीय आहे, असेही ते यावेळी म्हणाले. ते १९९२ पासून अमेरिकेत राहतात.
ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकरी आपल्या शेतात पिके घेतात आणि हे पीक शेतकऱ्याचे नशीब बदलते. वरच्या मजल्यावर ट्रॅक्टर ठेवून त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न मी केला आहे. मला लहानपणापासून बुलेट मोटारसायकल आणि ट्रॅक्टरची खूप आवड असून घराच्या छतावर ट्रॅक्टर ठेवावा, असे माझे स्वप्न होते आणि आज ते स्वप्न मी पूर्ण केले. ट्रॅक्टर हे शेती आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे प्रतिक आहे, असेही ते म्हणाले यामुळे त्याचा सन्मान हा प्रत्येकवेळी राखला पाहिजे, यामुळे मात्र ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
Share your comments