1. बातम्या

शेतकऱ्यानो फेब्रुवारी महिन्यात 'या' पद्धतीने गव्हाची आणि हरभऱ्याची घ्या काळजी आणि मिळवा बंपर उत्पादन

शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी (February) महिन्याची सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिना भाजीपाला लागवडीसाठी (Cultivation of vegetables) उत्तम असल्याचे सांगितले जाते मात्र असे असले तरी फेब्रुवारी महिन्यात हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात पिकांवर रोगांचे सावट बघायला मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकावर किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसताच क्षणी त्याचा बंदोबस्त करणे अपरिहार्य ठरणार आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Wheat Crop

Wheat Crop

शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी (February) महिन्याची सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिना भाजीपाला लागवडीसाठी (Cultivation of vegetables) उत्तम असल्याचे सांगितले जाते मात्र असे असले तरी फेब्रुवारी महिन्यात हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात पिकांवर रोगांचे सावट बघायला मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकावर किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसताच क्षणी त्याचा बंदोबस्त करणे अपरिहार्य ठरणार आहे.

यासंदर्भात कृषी वैज्ञानिकांनी (Agricultural scientists) शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. वैज्ञानिकांच्या मते, बदलत्या वातावरणामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव बघायला मिळू शकतो आणि याचा सरळ उत्पादनावर प्रभाव पडू शकतो त्यामुळे या रोगांवर वेळीच नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) आगामी काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे सध्यातरी कुठल्याही प्रकारची फवारणी करणे टाळावे. ढगाळ वातावरणात तसेच पावसामध्ये फवारणी केल्यास त्याचा पिकास कुठलाही फरक पडत नाही या उलट पिकावर याचा विपरीत परिणाम घडू शकतो तसेच केलेला खर्च वाया जाऊ शकतो. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊ शकते शिवाय मेहनतही वाया जाऊ शकते म्हणून ढगाळ वातावरण असताना तसेच पावसामध्ये फवारणी करणे टाळावे.

गव्हावर वाढू शकतो तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव

रब्बी हंगामात (Rabbi season) देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी केली जाते. या हंगामात गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पिकावर नेहमी लक्ष ठेवणे अपरिहार्य आहे, तांबेरा रोगाचे प्रादुर्भाव दिसताच क्षणी नियंत्रण करणे गरजेचे राहणार आहे नाही तर यामुळे सरळ उत्पादनात घट होऊ शकते. तांबेरा रोग आढळल्यास गव्हावर डायथेन एम-45 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो.

हरभर्‍यावर घाटेअळीचा वाढू शकतो प्रादुर्भाव

या बदलत्या वातावरणामुळे हरभरा पिकावर (Gram crop) घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता वर्तवली आहे. घाटे अळीपासून पिकाच्या संरक्षणासाठी एकरी चार फेरोमोन ट्रॅप लावण्याची शिफारस वैज्ञानिकांनी केली आहे. याव्यतिरिक्त इंग्रजीतल्या टी आकाराचे पक्षी थांबे देखील लावण्याची शिफारस वैज्ञानिकांनी केली आहे. ज्या हरभरा पिकाची फलधारणा 40 टक्के झाली आहे अशा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो त्यामुळे फळधारणा झाल्यानंतर विकासाकडे विशेष लक्ष देणे अपरिहार्य ठरणार आहे नाहीतर यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.

English Summary: Farmers take care of wheat and gram by 'Ya' method in the month of February and get bumper production. Published on: 05 February 2022, 11:29 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters