दुध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी २५ ऑगस्टपासून लेटर टू डेअरी मिनिस्टर हे आंदोलन सुरू केले जाणार आहे.
राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांना पत्र पाठवून प्रश्नांची तीव्रता कळावी, यासाठी हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची शुक्रवारी ऑनलाईन बैठक झाली. किसान सभेचे नेते डॉ. अजित ढवळे, डॉ. अजित नवले, शेतकरी नेते धनंजय धोर्डे , किसन गुजर, अशोक ढगे, आदी शेतकरी नेते सहगाभी झाले होते.
मात्र लॉकडाऊन पूर्वी दुधाला मिळणारा जो दर दर मिळत होता, तो ३५ रुपयांचा पुन्हा तातडीने मिळावा, एफआरपी चे धोरण तातडीने राबवावे यांसह अन्य मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा थांबणार नाही. राज्यात दुधासाठी शेतकरी लढ्यात उतरले आहेत. हा संदेश गेला. दूधदराचा लढा अधिक तीव्र होणार आहे. त्यासाठी हे आंदोलन सुरू केले आहे. या बैठकीत गुजरातेतील दूध उत्पादक नेते दयाभाई गजेरिया यांनी गुजराात राज्यात दुधाला दर चांगला मिळवून दिला आहे.
गुजरेत दूध संकलन तेथे दुधाला ४७ रुपये सरासरी दर, सोसायटीकडून दूध उत्पादकांना दिला जाणार बोनस लॉकडाऊनमध्येही ३० रुपयांच्या खाली आला नाही. दुधाच्या प्रश्नासाठी राज्य समन्वय समितीसोबत देशपातळीवर समन्वय समिती केली जात आहे. परंतु त्यासोबत आता प्रत्येक जिल्ह्यात दूध उत्पादक संघर्ष समिती करण्यात येत आहे.
Share your comments