सोयाबीनच्या या हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनचे दर ठरवण्यासाठी एक प्रमुख सूत्रधार ठरला होता. बाजारपेठेत घडत असलेल्या बदलाच्या अनुषंगाने शेतकरी सोयाबीनची विक्री करायची की साठवणूक करायची या गोष्टींवर ठाम होता. पण आता सोयाबीन चा हंगाम अंतिम टप्प्यात आहे आणि सोयाबीनच्या दरात कमालीची ओढाताण नजरेस पडत आहे, आणि या सर्व समीकरणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. आतापर्यंत सोयाबीन उत्पादक शेतकरी बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढले की हळूहळू नियोजनबद्ध पद्धतीने विक्री करत होता, तसेच सोयाबीनचे दर खालावले सोयाबीनची साठवणूक करण्याकडे लक्ष केंद्रित करत होता. पण आता हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे, आणि अवघ्या काही दिवसातउन्हाळी सोयाबीन चा हंगाम प्रारंभ होईल त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात सोयाबीनची साठवणूक करायची कि विक्री करायची याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
एकंदरीत परिस्थिती बघता सोयाबीनचे दर सध्या गजरात असतानादेखील सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन विक्रीवर भर देताना दिसत आहेत त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनची बर्यापैकी आवक नजरेस पडत आहे. आतापर्यंत सोयाबीन उत्पादक शेतकरी दरात पडझड होताच सोयाबीनची साठवणूक करण्याकडे वळत होता.मात्र गेल्या आठ दिवसापासून सोयाबीनच्या दरात घसरण बघायला मिळत आहे आता सोयाबीनचे दर 6200 रुपये प्रति क्विंटल वर येऊन ठेपले आहेत तरीदेखील लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची बऱ्यापैकी आवक बघायला मिळत आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात या विचाराचे काहूर
या हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकरी व्यापाऱ्यांच्या भूमिकेत अवतरल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजारपेठेचे गणित सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भलीभाती ज्ञात झाले होते. या हंगामात सोयाबिनच्या उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांना ठाऊक असल्याने, हंगामात कधीनाकधी सोयाबीनचे दर वाढतील या आशेने भाव कमी झाले की शेतकरी विक्री करणे थांबवून द्यायचे. तसेच बाजारपेठेत सोयाबीनला चांगला दर जरी मिळत असला तरी टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्रीवर सोयाबीन उत्पादक शेतकरी अडीग होता. शेतकऱ्यांच्या या नियोजनामुळे आणि अभ्यासू वृत्तीमुळे दिवाळीपूर्वी साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल विकला जाणारा सोयाबीन दिवाळीनंतर सात हजार रुपयांच्या घरात आले होते.
मात्र आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनच्या दरात जवळपास पाचशे ते सातशे रुपयांची मोठी घसरण नमूद करण्यात आली आहे आणि आता बाजारपेठेत सहा हजार दोनशे रुपये पर्यंत सोयाबीनला बाजार भाव प्राप्त होत आहे, दर कमी झाला असला तरी आता सोयाबीन उत्पादक शेतकरी आधीसारखा सोयाबीन साठवणूक करू इच्छित नाहीये आणि आता साठवणूक केलेला सोयाबीन विक्रीवर शेतकऱ्यांचा जास्त भर नजरेस पडत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे उन्हाळी हंगामातील सोयाबीन आगामी काही दिवसात बाजारपेठेत हजर होणार आहे आणि त्यामुळे नवा सोयाबीन बाजारात आल्यास दरावर विपरीत परिणाम होण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. त्यामुळे दर जरी खालावलेले असले तरी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सोयाबीन नजरेस पडत आहे.
तज्ञांचा हा आहे मोलाचा सल्ला
सोयाबीन चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे, आतापर्यंत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका सोयाबीनचे बाजारपेठेतील दर ठरवण्यास कारगर सिद्ध झाले आहेत. मात्र आता हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने बाजारपेठेतील चित्र आता बदलताना दिसत आहे सोयाबीन पेंडच्या दरात देखील घट नमूद करण्यात येत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरुवातीचा आपला फंडा आता वापरात आणू नये, म्हणजे जरी बाजारपेठेत सोयाबीनला कमी बाजार भाव प्राप्त होत असेल तरी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री सुरूच ठेवावी आता सोयाबीनच्या भंडारण करण्याकडे जास्त भर देऊ नये. आता हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे भाव वाढतील याची आशा बाळगण्यापेक्षा विक्रीवर जास्त फोकस ठेवणे आवश्यक आहे.
Share your comments