शेतकऱ्यांवर कितीही संकटे आली तर त्यामध्ये तो स्वतःला सावरत असतो. यावर्षी तर शेतकऱ्याच्या पदरी कोणतेच पीक पडले नाही जे की खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले तर फळबाग काढणीला आली तो पर्यंत अवकाळी पावसाने थैमान घातले तर इकडे पीक विमा कंपनीचा मनमानी कारभार त्यामध्ये सगळीकडून च शेतकऱ्याला पॅक केल्यासारखे झाले आहे. सध्या शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे ओळत आहेत. मराठवाडा भागात शेतकऱ्यांनी शेतीमध्ये मोठा बदल केला आहे तर यंदाच्या रब्बी हंगामात औरंगाबाद भागात काळ्या तांदळाचा नवीन प्रयोग केला आहे. याचा नक्की काय फायदा होईल हे कृषी विभागाच्या सुद्धा सांगता आले नाही मात्र शेतकऱ्यांचे कौतुक मात्र झाले आहे. या आधी हा प्रयोग नांदेड, अकोला आणि पुणे जिल्ह्यात केला होता जे की यंदाचे पोषक वातावरण पाहून कृष्णा फलके यांनी काळ्या गहू लावला आहे. या काळ्या गव्हाची पेरणी पद्धत पारंपरिक गव्हाच्या पेरणी प्रमाणेच आहे मात्र उत्पादनामध्ये काय फरक आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काळ्या गव्हाची थोडक्यात माहिती...
पंजाब कृषी विद्यापीठाने काळ्या गव्हाचे वाण विकसित केले आहे. यापूर्वी काळ्या गव्हाचे उत्पादन पुणे, अकोला तसेच मराठवाड्यातील नांदेड मध्ये घेण्यात आले. सर्वात आधी पंजाब, हरियाणा आणि आता हळूहळू दुसऱ्या राज्यात सुद्धा हा वाण पेरला जात आहे. पेरणी करण्यासाठी प्रति एकर ४० किलो पेक्षा कमी बियानाची आवश्यकता असते तर १० - १२ क्विंटल प्रति एकर उत्पन्न निघते. सेंद्रिय खताचा वापर केला तर उत्पादनात जास्तच वाढ होते. बाजारपेठेमध्ये काळ्या गव्हाला ६ हजार ५०० रुपये दर भेटत आहे.
काळ्या गव्हाचे औषधी महत्व...
काळ्या तांदळाचे जसे औषधी गुण आहेत त्याचप्रमाणे काळ्या गव्हाला सुद्धा औषधी गुणधर्म आहेत. काळा गहू हा मधुमेह, रक्तदाब तसेच कर्करोगावर गुणकारी आहे असा दावा केला जात आहे याव्यतिरिक्त या गव्हाचा उपयोग सेंद्रिय खत म्हणून जास्त उत्पादन घेण्यासाठी केला जातो अशी शिफारस विद्यापीठाने केली आहे. काळ्या गव्हात औषधी गुणधर्म असल्याने पुढे भविष्यात याचे क्षेत्र वाढणार आहे असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
रोगराईचा धोकाही कमीच...
वातावरणामध्ये बदल झाला की त्याचा परिणाम सर्वच पिकांवर दिसतो मात्र काळ्या गव्हाची रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे त्यामुळे मावा तसेच तुडतुडे चा यावर प्रादुर्भाव पडत नाही. अवकाळी पावसाने सुद्धा याचे नुकसान होत नाही त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आली तरी सुद्धा याचे नुकसान होत नाही.
Share your comments