1. बातम्या

शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या फळपिकांच्या वाणांचाच वापर करावा

मुंबई: सिताफळ व सर्व फळपिकांकरिता कृषी विद्यापिठांनी शिफारस केलेल्या वाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
सिताफळ व सर्व फळपिकांकरिता कृषी विद्यापिठांनी शिफारस केलेल्या वाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

शेतकरी फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. तथापि सुरुवातीच्या तीन ते पाच वर्षाच्या फळधारणापूर्व कालावधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागते. फळधारणा होत नाही तोपर्यंत वाणाच्या गुणवत्तेबाबत काहीही सांगता येत नसल्याने कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या वाणांचा वापर केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

राज्यात अनधिकृत रोपवाटिकांमधून कृषी विद्यापीठांनी शिफारस न केलेल्या सिताफळ वाणांची कलमे/रोपे उपलब्ध करुन दिली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचा वापर शेतकऱ्यांनी करु नये, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. 

English Summary: Farmers should use the varieties of fruit crops recommended by the Agricultural Universities Published on: 02 September 2019, 07:21 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters