राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न अजूनही कायम आहे. यामुळे अजूनही शेतकऱ्यांची धडपड सुरूच आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील हा प्रश्न काही मार्गी लागलेला नाही. यामुळे राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. आता मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील नोंदी घेऊन अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पाच जिल्ह्यांमध्ये समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी आता हे काम बघणार आहेत.
आता मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसाठी समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. तसेच त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि राहिलेला ऊस तोडण्यासाठी या अधिकाऱ्याची सगळी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जालन्यासाठी सुरेश सुपेकर- 9807172727, बीड- व्ही.पी सोनटक्के- 7972486806, उस्मानाबाद-सुदाम रोडगे- 9422467894, परभणी- अविनाश हिवाळे- 7972077537, लातूर- कुबेर शिंदे- 9822782145 अशी नवे आहेत.
आता या अधिकाऱ्यांशी संपर्क करून आपला ऊस किती राहिला आहे, याबाबत माहिती द्यावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये किसान सभेच्या माध्यमातून किती ऊस राहिला आहे, याची नोंद मोहीम त्यांनी हाती घेतली होती. जिल्ह्यामध्ये एकूण क्षेत्र, त्यापैकी नोंद झालेले किंवा न झालेल किती आहे? जिल्हाबाहेरील साखर कारखाने किती टन ऊस गाळपासाठी घेऊन जातात याबाबतची माहिती साखर कारखाने हे शेतकऱ्यांना देत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना नेमकी परिस्थिती समजत नाही.
आता ही माहिती गोळा करुन ती साखर आयुक्तांना देण्याची जबाबदारी ही या अधिकाऱ्यांवर आहे. मराठवाड्यातील ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. हंगाम अंतिम टप्प्यात आला तरी ऊसाचे गाळप झालेले नाही शिवाय शेतकऱ्यांना क्षेत्र रिकामे करुन इतर पीकही घ्यावयाचे आहे. तसेच ऊस जास्त दिवस राहिला तर शेतकऱ्याचेच नुकसान होणार आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांचा ७/१२ होणार कोरा, कोण ठरले भाग्यवान? वाचा लिस्ट...
पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीची कोटींची उड्डाणे, आता तुम्हीच ठरवा प्रशासक की संचालक मंडळ..
शेतकऱ्यांनो आता वीज तोडली तरी घाबरू नका, पठ्ठ्याने ट्रॅक्टरच्या सहायाने केली वीज निर्मिती
Share your comments