आनंद ढोणे
परभणी : पूर्णा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी इतर साखर कारखान्यास ऊस न देता आपला ऊस पूर्णा सहकारी साखर कारखान्यास द्यावा असे अवाहन पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा साखर महासंघाचे अध्यक्ष, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले आहे. आज (दि.६)रोजी पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा ४३ व्या बायलर अग्निप्रदीपन व ऊस मोळी पुजन कार्यक्रमात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी वसमतचे कार्यसम्राट आमदार तथा संचालक राजू भैया नवघरे यांनी देखील शेतक-यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपाध्यक्ष डॉ सुनिल कदम, डॉ शिला कदम, संचालक शहाजी देसाई, श्रिधर पारवे व त्यांच्या सुवैद्य पत्नी,बालासाहेब बारहाते यासह सर्व संचालक उपस्थित होते. कार्यकारी संचालक सुनील दळवी यांनी सुत्रसंचलन केले. सदर कार्यक्रमास माजी आमदार पंडीतराव देशमुख, महागावकर, रामचंद्र बागल, हरिभाऊ शेळके, सुभाष लालपोतू, उतमराव कदम,संचालक प्रलादराव काळे सह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी आमदार नवघरे म्हणाले की, ऊस कुठे न देता पूर्णा साखर कारखानाला द्या, उस उत्पादक शेतकऱ्यांना कोणतीही अडणच येणार आहे. अडचण असल्यास सभासद म्हणून आणि कुटुंब त्यावर मार्ग काढू, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. तसंच मागील हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बाकीच्या कारखान्यांना ऊस दिला पण त्यांचे पैसे ८ महिने मिळाले नाहीत. तसंच आपला कारखाना आपली लक्ष्मी आहे त्यामुळे कारखाना चालवणे आपले कर्तव्य आहे, असं देखील नवघरे म्हणाले.
Share your comments