शेतकऱ्यांसमोरील संकटांची मालिका काही केल्याने संपताना दिसत नाही. सध्या जनावरांमध्ये एक आजार आला असून त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. जनावरांमधील लाळखुरखुर्द आजारामुळे सध्या शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवले आहे. यामुळे आता जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनातर्फे जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले आहे. या आजाराची अणे लक्षणे आहेत. यामध्ये लाळखुरखुर्द या आजारामुळे जनावरांची चारा खाण्याची इच्छाच मरते व त्यानंतर जनावराच्या पाचन क्षमतेसह शरीरावर त्याचा परिणाम दिसू लागतो. यामुळे ही लक्षणे ओळखणे गरजेचे आहे.
तसेच या आजारामुळे जनावरांची दूध देण्याच्या क्षमतेवर देखील त्याचा परिणाम होत असल्याचे पशुवैद्यकीय विभागातर्फे सांगण्यात आले आहे. हळूहळू लाळखुरखुर्द या आजाराने ग्रस्त झालेले जनावर काही काळानंतर दगावण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे या जीवघेण्या व संसर्गजन्य आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र शासनातर्फे जिल्हा पशु वैद्यकीय विभागामार्फत लसीकरण मोहीम संपूर्ण देशभरामध्ये राबविण्यात येत आहे. यामुळे आपल्या जनावरांचे लसीकरण करणे गरजेचे आहे.
सध्या मानवामध्ये ज्याप्रमाणे कोरोना व्हायरस विषाणू जीवघेणा ठरत आहे. त्याचप्रमाणे जनावरांमध्ये देखील लाळखुरखुर्द हा जीवघेणा आजार ठरत असल्याचे मत जिल्हा जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे प्रशासनातर्फे जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले आहे. यामध्ये सध्या सहा महिन्यातून एक डोस याप्रमाणे वर्षभरातून दोन लसीचा डोस जनावरांना जिल्हा पशुवैद्यकीय विभागातर्फे देण्यात येत आहे. यामुळे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत केंद्र शासनातर्फे मोबाईलवरील ई गोपाला या ॲपवर आवश्यक असलेली सर्व माहिती देण्यात आली आहे. आपल्या जनावरांचे लसीकरण झाल्याची देखील आपणास ॲपच्या माध्यमातून सर्व माहिती उपलब्ध होत असल्याने पशुपालकांनी ई गोपाला हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून जनावरांच्या संदर्भातील कुठलीही माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे. यामुळे याबाबत सध्या जागरूक असणे गरजेचे आहे.
Share your comments