प्रथम कोरडवाहू शेतीच्या अत्यंत कमी उत्पादकतेबाबत शेतकरी मित्र, कृषी क्षेत्रातील विस्तार कार्यकर्ते तसेच संशोधक शास्त्रज्ञ या सर्वांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे, असे मला वाटते. कारण एखादे पीक अपयशी ठरले तर त्यावर आपल्याकडे पीक बदल हा पर्याय पटकन सुचविला जातो. परंतु त्या पिकाच्या अपयशावर फारशी चर्चा केली जात नाही. त्यामुळे शेती ही वेळोवेळी घाट्याची होत चालली आहे, पुरातन काळापासून आपल्याकडे तृणधान्य आणि कडधान्य वर्गीय पिके प्रामुख्याने घेतली जातात.
हरितक्रांतीनंतर ९० च्या दशकात यात हळूहळू आमूलाग्र बदल होत गेला. या पिकांची जागा नगदी पिके म्हणून सोयाबीन आणि कापूस यांनी घेतली याचा परिणाम असा झाला, की जनावरांसाठी आणि मनुष्यासाठी घेतली जाणारी तृणधान्य पिके, जसे की ज्वारी, बाजरी नामशेष होत चालली आहेत, त्याचा परिणाम शेतकरी मित्रांकडे पशूंची संख्या नगण्य झाली.
त्याचा परिणाम कोरडवाहू शेतीला दिले जाणारे शेणखत बंद झाले. सातत्याने एकच पीक घेतल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब ०.५ च्या खाली आला. जमिनीची उत्पादकताही घटली. त्यामुळे पिकांना शिफारशीपेक्षा जास्त रासायनिक खताचा वापर करूनही म्हणावे तसे पीक येत नाही.
जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी असल्यामुळे उभ्या पिकांनी रासायनिक खते घेण्याचे प्रमाण कमी झाले. याचा परिणाम रासायनिक खते जमिनीत तशीच पडून राहायला लागली आणि हळूहळू ती पाण्यातून झिरपून पाण्याच्या स्रोतात आली.
कांद्याच्या दरासाठी आता अजित पवार आक्रमक, सभागृहात केली मोठी मागणी..
त्यामुळे जलस्रोत प्रदूषित होऊन मानवी पिण्याचे पाणी धोकादायक बनू लागले आहे. तसेच प्रतिवर्षी जमिनीची नांगरणी केल्यामुळे मातीच्या कणाची रचना बदलून जमिनीची जलधारण क्षमता कमी झाली. तसेच दरवर्षीच्या नांगरणीमुळे जेव्हा लहरी पाऊस कमी वेळात जास्त पडतो त्या काळात जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे.
याचा परिणाम हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेले सिंचन प्रकल्प गाळाने भरून चालले आहेत. त्यामुळे त्यांची जलधारण क्षमता कमी होत आहे. आज या पीक बदलाचा परिणाम मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. स्वस्त धान्य दुकानातून गहू आणि तांदूळ कमी भावात मिळत असल्यामुळे ज्वारी आणि बाजरी ही तृणधान्य पिके आहारातून बाद झाली आहेत.
शेतकऱ्यांनो केळी काळी का पडतात? वाचा सविस्तर..
शेतकऱ्याला अंदाजे त्याची मेहनत न धरता जेमतेम अडीच हजार रुपये उरतात. मी २०१० पासून पूर्णपणे कोरडवाहू शेतकरी आहे. त्यामुळे वरील वास्तवाचा विचार करून प्रतापराव चिपळूणकर यांच्याशी विना नांगरणी शेती यावर संवाद साधून मागील चार वर्षांपासून माझ्या कापूस आणि तूर या पिकांतील नांगरणी, आंतरमशागतीसाठी वखरणी ही पूर्णपणे बंद केली आहे.
याचा मला चांगला परिणाम दिसून आला आहे. सुरुवातीला मला लोकांनी वेड्यात काढले होते, परंतु आता हळूहळू या तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेतीत, तसेच द्राक्ष, डाळिंब, मोसंबी या पिकांतही दिसून येत आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी आमच्या जवळ बाहेरून विकत आणून काही टाकण्यास पैसे नाहीत. त्यामुळे तण व्यवस्थापन हाच एकमेव उपाय आम्हा शेतकऱ्यांकडे राहिलेला आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांचा वाली आहे का कोणी? अधिवेशनात बघताय ना कसा राडा सुरूय..
पीकविमा नेमका कोणाच्या फायद्याचा, त्याचा फायदा काय?
शेतकऱ्यांनो शेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर
Share your comments