1. बातम्या

शेतकऱ्यांनो पंजाब डख यांनी केलेला पावसाविषयी अंदाज वाचा, शेतीच्या कामाबाबत आहे फायद्याचे..

काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना हवामान तज्ञ (Panjabrao Dakh) पंजाबराव डख यांच्या सल्ल्याचा मोठा फायदा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे याकडे दरवेळी लक्ष लागते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Farmers Punjab Dakh's rain forecast

Farmers Punjab Dakh's rain forecast

सध्या राज्यासह देशात तापमान वाढू लागले आहे. यामुळे दोन महिन्यानंतर पावसाला सुरुवात होईल. सध्या शेतकरी येणाऱ्या पावसाची वाट बघत आहेत. त्यानंतर त्यांची शेतातील कामे सुरु होतील. असे असताना गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना हवामान तज्ञ (Panjabrao Dakh) पंजाबराव डख यांच्या सल्ल्याचा मोठा फायदा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे याकडे दरवेळी लक्ष लागते.

आता अकोल्यातील तेल्हारा तालुका कृषी व्यावसायिक संघाच्या कार्यक्रमात त्यांनी पावसाबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये यंदाही मूबलक प्रमाणात पाऊस असल्याचे भाकीत त्यांनी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता सोडून उत्पादनवाढीच्या अनुशंगाने पिकांचे गणित मांडावे असाही सल्ला दिला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांनी तसे नियोजन केले तर अनेकदा त्यांना फायदा झाला आहे.

पेरणीपूर्व 15 ते 30 मे च्या दरम्यान पाऊस झाला तर तो पेरणीयोग्य पाऊस असतो. किमान 100 मीमी पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवणे फायद्याचे ठरणार आहे. ऐन कामाच्यावेळी पाऊस झाला तर खूपच पळापळ होते. यामुळे त्यामुळे योग्य पाऊस झाल्यावरच पिकांचा पेरा केला तरच वाढ आणि उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कामाच्या अनेक गोष्टी सोयीस्कर होतात.

सध्या हवामानावर आधारितच (Farming) शेती व्यवसाय झाला आहे. यावरच उत्पादन आणि पीक पध्दती ठरत आहे. शिवाय (Weather experts) हवामान तज्ञांनी वर्तवलेले अंदाजही अचूक ठरत असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. उपाययोजनाबाबत शेतकऱ्यांनाही याचा फायदा होत आहे. यामुळे पावसाचा अंदाज लावूनच कामे केली तर ते फायदेशीर ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या;
ऊस पिकावर ड्रोनने खते आणि कीटकनाशकांची फवारणी केल्यास आहे फायदाच फायदा, वाचा संपूर्ण माहिती..
भावा फक्त तूच रे!! परदेशातील नोकरीला लाथ मारून करतोय शेती, आज लाखोंची उलाढाल
मोठी बातमी! ठाकरे सरकारचा धडाकेबाज निर्णय, कर्जमाफीबाबाबत आता शेतकऱ्यांचे टेन्शनच मिटले..

English Summary: Farmers, read Punjab Dakh's rain forecast, it is beneficial for agricultural work. Published on: 28 March 2022, 10:34 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters