1. बातम्या

Farmer Protest: राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकरी आक्रोश मोर्चाला आजपासून सुरूवात

मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसानं राज्यात धुमाकुळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, मका, द्राक्षबागा यांसह इतर हाताशी आलेली पिके पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला असुन सरकारने नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
Shetkari Aakrosh Morcha

Shetkari Aakrosh Morcha

मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसानं राज्यात धुमाकुळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, मका, द्राक्षबागा यांसह इतर हाताशी आलेली पिके पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला असुन सरकारने नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चा दरम्यान ट्रॅक्टर रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. 30 नोव्हेंबर रोजी जळगाव येथे, 1 डिसेंबर रोजी दिंडोरी येथे तर 5 डिसेंबर रोजी अमरावती येथे हा मोर्चा निघेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यासंर्दभात जयंत पाटील यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले की, निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. अशावेळी या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पिक विम्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सरकारने देखील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप होणार असल्याची घोषणा दिवाळीपूर्वी केली होती. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात २ रुपये, ३ रुपये, ३३ रुपये अशी तुटपुंजी मदत जमा करून त्यांची थट्टा केल्याचे जयंत पाटील म्हणाले.

तसेच राज्यभरात अतिवृष्टी आणि गारपीट झाली. याबाबत हवामान खात्याने आधीच इशारा दिला होता. याबाबत काही चर्चा कॅबिनेट बैठकीत व्हायला पाहिजे होती पण तसे झाले नाही. मंत्री चर्चा पेक्षा वाद घालण्यात मग्न आहेत. एकमेकांची उणिधुणी काढत आहेत. या लोकांची आश्वासन म्हणजे लबाडा घरचे आवतण आहे. म्हणून यांना खाली उतरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा शेतकरी आक्रोश मोर्चा आहे. राज्यातील तम्माम शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि या सरकारची कान उघडणी करण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की, तुम्ही या मोर्चात सहभागी व्हा असे आवाहन ही जयंत पाटील यांनी या पोस्टच्या माध्यामातून शेतकऱ्यांना दिले आहे.

English Summary: Farmers' protest march by NCP starts from today Published on: 30 November 2023, 05:18 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters