कृषी जागरण आयोजित मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2023 प्रायोजक महिंद्रा ट्रॅक्टर कार्यक्राचा काल पहिला दिवस उत्साहात पार पडला. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी कृषी जागरण आयोजित 'महिंद्रा मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड' अंतर्गत आयोजित प्रदर्शनाचा आढावा घेतला. प्रदर्शनाचा आढावा घेतल्यानंतर ते शेतकऱ्यांना संबोधित केले.
देशातील सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे गडकरी म्हणालेत. ज्यामध्ये सरकारला काही प्रमाणात यश आले आहे. ते म्हणाले की भारतातील सुमारे 65% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. गांधीजी म्हणायचे की आपल्या देशाची लोकसंख्या खेड्यात राहते. मात्र ग्रामीण भागातून सातत्याने स्थलांतर सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नासल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पाहिजे तशी मजबूत झालेली नाही. त्यामुळे गावातील तरुण रोजगाराच्या शोधात मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये स्थलांतर करत आहेत देशातील शेतकऱ्यांची प्रगती करायची असेल, तर उत्पादन खर्च कमी करावा लागेल, तरच शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल असंही नितीन गडकरी म्हणाले.
ड्रोनच्या साह्याने शेती करा -
यावेळी त्यांनी शेतीमध्ये ड्रोनच्या वापरावरही भर दिला. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये ड्रोनचा वापर केल्यास त्यांची खूप बचत होईल, असे ते म्हणाले. देशातील शेतकरी आता आधुनिक होत आहेत. त्यामुळे शेतीमध्येही ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करावा. जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल.
यादरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, "शेतकऱ्यांनी केवळ 'अन्नदाता' न राहता 'उर्जादाता' बनले पाहिजे. येत्या काळात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या इथेनॉलवर सर्व वाहने धावतील. पण त्यासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीवर भर द्यावा. बांबू पासून इथेनॉल आणि विज निर्मितीही केल्या जाते. त्यामुळे प्रदूषण आणि तेलाची आयातही कमी होईल. आज शेतकरी अन्नदाता आहे पण, लवकरच ते इंधन पुरवठादार देखील बनतील असेही मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
Share your comments