शेतकरी आंदोलन - संयुक्त किसान मोर्चाची आज भारत बंदची हाक

26 March 2021 01:54 PM By: भरत भास्कर जाधव
bharat bandh

bharat bandh

नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने आज भारत बंद ची हाक दिली आहे.

 या बंदला महाविकासस आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असून विविध संस्था , संघटनांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कृषी कायदे, प्रस्तावित वीजबील कायदा रद्द करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, तसेच शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी दिल्लीच्या विविध सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी चार महिने पूर्ण होत आहेत.

 

त्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मर्चाने बंदचे आवाहान केले असून त्याला आघाडीतील घटक पक्षांसह देशभरातील अनेक पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा किसान सभेने केला आहे. याशिवाय होळीच्या दिवशी या कायद्यांची होळी करण्यात येणार आहे. भारत बंदला काँग्रेस पक्ष सक्रिय पाठिंबा देत राज्यभर उपोषण करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले  यांनी यापुर्वीच जाहीर केले आहे.

तर भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील जाहीर केले आहे. केंद्र सरकारच्या काळ्या कृषी कायद्याविरोधात गेल्या १०० दिवसांपेक्षा जास्त दिवसस देशातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. यामध्ये आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मृत्यू झाला आहे.

Farmers' Movement bharat Bandh शेतकरी आंदोलन भारत बंद संयुक्त किसान मोर्चा Samyukta Kisan Morcha
English Summary: Farmers' Movement - Samyukta Kisan Morcha calls for India Bandh today

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.