शेती करताना अनेक गोष्टी आपल्याला लागतात. असे असताना अनेक महागडी अवजारे देखील त्यांना खरेदी करावी लागतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होतात. तसेच अनेकांचे गवताचे रान असते. यामुळे त्या रानात सारखे खुरपावे लागते. यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करावा लागतो. असे असताना आता कोळपं उपकरणामुळे कोळपणीच्या समस्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत. सातारा जिह्यातील चिंचनेर येथील 73 वर्षीय शेतकरी अशोक जाधव यांनी शेतीच्या कामात उपयुक्त ठरणारे असे कोळपे तयार केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा त्रास कमी होणार आहे.
सध्या मजुरांची मोठी समस्या शेतकऱ्याना सतावत आहे. तसेच जे मजूर काम करण्यासाठी तयार असतात त्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे शेतकरी तोट्यात आहे. असे असताना अशोक जाधव यांनी तयार केलेल्या यंत्रामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे ऊस, गहू, ज्वारी, हळद, भुईमूग, आलं, ज्वारी, गहू अशा सगळ्या पिकांचे तण काढता येतात. यामुळे या यंत्राला देशभरातून मागणी येत आहे. असे त्यांनी सांगितले आहे. तसेच हे यंत्र अगदी कमी खर्चात आपल्याला उपलब्ध होणार आहे.
अवघ्या ४०० रुपयात हे यंत्र आपल्याला मिळणार आहे. अशोक जाधव यांनी रानात तण काढण्यासाठी होणार खर्च आणि कीटकनाशक याचा वापर त्यांना पूर्णपणे बंद करायचा होता. यामुळे त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि त्यांनी हे यंत्र बनवण्याचा निर्णय घेतला. अनेक कृषी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या या यंत्राचे कौतुक केले आहे. तसेच अनेक कृषी प्रदर्शनात याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायद होणार आहे. अगदी साध्या आणि लगेच उपलब्ध होतील अशा वस्तूंचा वापर करून त्यांनी हे यंत्र बनवले आहे.
त्यांनी यासाठी दोन लोखंडी गज घेऊन त्याची दोन टोके वाकवली. मधोमध 8 ते 10 इंच लांबीची पातळ धातूची तार बसवली. नंतर दोन्ही टोकांना एका धातूच्या पाइपसोबत जोडून त्याचे हँडल केले. हे यंत्र तयार करत असताना त्यांना अनेकदा बदल करावा लागला. मात्र त्यांनी हार न मानता सलग दोन वर्ष यावर अभ्यास केला आणि हे यंत्र तयार केले. त्यांनी पुण्यात मशिनिस्ट म्हणून काम केले होते. तो अनुभव कामी आला. आता हे यंत्र तण काढण्यासाठी उपकरण सक्षम असून याला मोठी मागणी आहे. या अभिनव प्रयोगामुळे या शेतकऱ्याचे कौतुक केले जात आहे. मजुरीच्या समस्येवर आता हा एक मोठा शोध मानला जात आहे.
Share your comments