शेतकऱ्यांना नेहमीच वेगळेगळ्या संकटांना सामोरं जावं लागतं आहे. निसर्ग अनेकदा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेत आहे. आताही अपुऱ्या पावसामुळे उडीद आणि बाजरीला मोठा फटका बसला असून तुरीवर वांझ रोगाचा प्रादुर्भाव झालाय.
हा रोग आटोक्यात न आल्यास कर्जत जामखेड मतदारसंघातील सुमारे २१ हजार हेक्टरवरील तुरीचं नुकसान होण्याचा धोका आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी तुरीचे उत्पादन घेतात. मात्र नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांना पिकविम्याची मदत मिळवून देण्यासाठी रोहित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पंचनामे करण्याची आणि विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करण्याची मागणी त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना भेटून केली. याबाबत तत्काळ अहवाल सादर करण्याचा आदेश त्यांनी कृषी आयुक्तांना दिला.
मानवी महत्वाकांक्षानी क्रुरतेचा कळस गाठला! पाखरांसह त्यांच्या पिल्लांचा केला खून...
तसेच ‘पोकरा’ योजनेमध्ये विदर्भासोबतच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या भागाचाही समावेश करावा, याबाबतही या भेटीत चर्चा झाली. यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर आनंद महिंद्रा यांनी घेतली शपथ, म्हणाले यापुढे कधीच कारमध्ये..
कृषी जागरणचे २६ व्या वर्षात पदार्पण, देशातील शेतकऱ्यांचे हित जोपासणारा पहिला मीडिया हाऊस..
बातमी कामाची! आता विमा पॉलिसीवर कर्ज मिळेल, व्याजदरही कमी, वाचा महत्वाची माहिती
Share your comments