येत्या काळात हिरव्या चाऱ्याची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मुरघास निर्मिती योग्य ठरते. त्यामुळे जनावरांना योग्य गुणवत्तेचा आणि चांगला आहार मिळण्यास मदत होते. पावसाळ्याच्या शेवटच्या काळात अतिरिक्त उपलब्ध असलेला हिरवा चारा योग्य वेळी कापून काही कालावधी करता विशिष्ट पद्धतीने साठवून ठेवल्यावर त्यावर किण्वन प्रक्रिया होऊन लुसलुशीत व चवदार चारा मिळतो त्याला मुरघास असे म्हणतात.
हिरवा चारा साठवून ठेवण्याची ही अत्यंत उत्कृष्ट पद्धत आहे. मुरघास केल्याने हिरव्या चाऱ्याची गुणवत्ता वाढते. टंचाईच्या काळात जनावरांना मुरघासरूपाने हिरवा चारा मिळतो. मुरघास तयार करण्याची पद्धती खालील प्रमाणे. मुरघास निर्मितीमुळे जनावरांना चाराटंचाईच्या काळात दर्जेदार चारा उपलब्ध होतो. हा चारा पचनास सोपा, तसेच चवीला उत्तम असल्याने जनावरे आवडीने खातात.
त्तम मुरघास कसा ओळखावा? : यामध्ये मुरघासाला सोनेरी पिवळा किंवा हिरवट पिवळा रंग येतो. आंबट गोड वास येतो. उत्तम दर्जाच्या मुरघासाचा सामू ३.५ ते ४.२ असतो. ६५ ते ७० टक्के पाण्याचे प्रमाण असते.
मुरघास देण्याची पद्धत : मुरघास सायलो मधून जनावरांना खाण्यासाठी काढताना, एका बाजूने उघडून आवश्यक तितका मुरघास बाहेर काढावा. आणि पुन्हा झाकून ठेवावा. खड्डा पूर्णपणे उघडू नये. जेणेकरून हवा आतमध्ये जाणार नाही आणि मुरघास खराब होण्याची शक्यता टाळली जाईल. मुरघासाचा जनावरांच्या आहारात हळूहळू वापर करावा. मुरघासाचा सामू आम्लधर्मीय असतो.
चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण तपासण्यासाठी कुट्टी केलेल्या चाऱ्याचा हाताने गोल चेंडू करावा. चेंडू लगेच उलगडला तर पाण्याचे प्रमाण कमी आणि चाऱ्याचा चेंडू तसाच राहिला तर पाण्याचे प्रमाण जास्त आहे असे समजावे. चाऱ्याच्या चेंडू हळूहळू उघडला, तर चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण योग्य आहे असे समजावे. उपलब्ध हिरवा चारा आणि जनावरांची संख्या यावरून मुरघास निर्मितीचे प्रमाण ठरवावे.
हमीभाव नाही तर मतदान नाही! या राज्यातील शेतकरी पेटून उठला...
अलीकडे बाजारामध्ये सायलेज इनोक्युलमदेखील उपलब्ध आहेत. त्याचा मुरघास बनविण्याकरिता वापर केल्यास कमी कालावधीत उत्तम दर्जाचा मुरघास बनविता येतो. सायलेज इनोक्युलम उपलब्ध असल्यास मळी किंवा गूळ टाकण्याची गरज भासत नाही. खड्डयात कुट्टीचा चार इंच उंचीचा थर झाल्यावर तयार केलेल्या मिश्रणाचा फवारा घ्यावा. आणि थर चांगला दाबून घ्यावा, त्यामुळे त्यातील हवा बाहेर निघून जाईल.
खड्डा किंवा ड्रम किंवा बॅग इत्यादी व्यवस्थित भरल्यानंतर त्यावर प्लॅस्टिकचा कागद झाकून पालापाचोळा, उसाचे पाचट किंवा गवताचा थर पसरून आच्छादन करावे. या आच्छादनावर पाच इंचाचा मातीचा थर द्यावा, जेणेकरून तो हवाबंद स्थितीत राहील.
बैलजोडीच्या किमतीत येईल कार, गावकऱ्यांनी काढली मिरवणूक, किंमत ऐकून डोळे होतील पांढरे...
Share your comments