1. बातम्या

शेतकऱ्यांनो ऐका ! पीक काढणी करताना द्या आरोग्याकडे लक्ष ; पराभूत करा कोरोनाला

सध्या पीक काढणीचा हंगाम चालू आहे, याच बरोबर देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसने पूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. दरम्यान सरकार विविध उपाय योजना करुन या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असून देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.

KJ Staff
KJ Staff


सध्या पीक काढणीचा हंगाम चालू आहे,  याच बरोबर देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.   या व्हायरसने पूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे.  दरम्यान सरकार विविध उपाय योजना करुन या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असून देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.  या लॉकडाऊन मध्ये शेतकरी आणि कष्टकरी लोकांचे मोठे नुकसान होणार आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली. या लॉकडाऊनमध्ये सर्वप्रकारचे उद्योग धंदे बंद पडले आहेत. मात्र शेती आणि शेतीच्या पुरक व्यवसाय चालूच राहणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.  दरम्यान शेतीची कामे करताना आरोग्याची योग्य काळजी घ्यायची आहे, जेणेकरुन  या लढाईत कोरोना पराभूत होईल. पीक काढणीच्या यंत्रांना साफ करुन घ्या, त्यांना सॅनिटायझर करु घ्यावे.  जी साधने तुम्ही हातांने हाताळत असलाल तर त्यांना तुम्ही सॅनिटायझ करावे. दिवसातून दोन तीन वेळा साधनांना सॅनिटायझ करावे. उपकरणांना स्वच्छ करण्यासाठी साबणाच्या पाण्याचा उपयोग करु शकता.

शेतीची कामे करताना सोशल डिस्टंशनचं भान ठेवा (SOCIAL DISTANCING)
दरम्यान पीकांची काढणी करताना शेतकऱ्यांनी सोशल डिस्टंशनचे भान ठेवण्याचे आदेश राजस्थानच्या कृषी विभागाने दिले आहे. काम करताना आणि जेवण करताना दोन व्यक्तींमध्ये साधारण ५ मीटरचे अंतर ठेवावे.  आपण ही या गोष्टीची काळजी घ्यावी, आणि कोरोनाला पराभूत करावे. आज सकाळी मुंबईतील बाजार समिती चालू झाली, तेथे मात्र सोशल डिस्टंसची धुळधाण करण्यात आली.  आपण या गोष्टीचे भान ठेवत आपले कर्तव्य पार पाडावे. जेवनाचे भांडे आणि पाणी पिण्याचे भांडेही वेगवेगळे ठेवावे. पीक काढणीच्या दरम्यान वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.  एकदा परिधान केलेले कपडे परत घालू नयेत.   कापणीच्यावेळेस किंवा शेतीची इतर कामे करताना आपण कामेचे वेगळे कपडे परिधान करत असतो.  परंतु एकच कपडा परत परत परिधान करु नये.

English Summary: Farmer's keep in mind agriculture department issues notice for farmer to harvesting Published on: 28 March 2020, 05:07 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters