
pigeon pea crop
सध्या राज्यातील वातावरणात मोठे बदल होताना दिसत आहे. या बदलांमुळे पिकांचे नुकसान होत असुन याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील तुर पिकावर ‘फायटोप्थोरा ब्लाईट’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे तुरीचे पीक पिवळे पडून सुकू लागले आहे. त्यामुळे राज्यातील सहा लाख हेक्टरवरील तुरीचे पीक धोक्यात आले आहे.
खरीप हंगामाच्या वेळी राज्यांत अनेक ठिकाणी कमी पाऊस पडल्याने दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली होती. त्यातच आता हवामान विभागाच्या माहितीनूसार राज्यात पुढील ५ दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका तुर बसणार असून तुर उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
गेल्या वर्षी ‘फायटोप्थोरा ब्लाईट’ या रोगामुळे तुरीच्या उत्पादनात ५० ते ६० टक्के घट झाली होती. त्यामुळे यावर्षीही या रोगामुळे तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फायटोप्थोरा ब्लाईट या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी करत आहेत.
Share your comments