मागील तीन दिवसांपासून ठिक-ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस पडत आहे. त्यामुळे रब्बी पिकांसह, द्राक्ष, डाळिंब, आंबा, ऊस, आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे ऊसतोडणी प्रभावित झाली आहेत. राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला.
बुधवारी कोल्हापूर, नगर, नाशिक,पुणे, भागांत हलका पाऊस पडला. मराठावाड्यातील लातूर जिल्ह्यातील देवणी मंडळात ५० मिलीमीटर, बोरोळ मंडळात ३३ मिलीमीटर ३३ मिलीटर पाऊस झाला. याचा परिणाम हरभरा, ज्वारी, गहू, द्राक्षे, आंबा पिकांवर होणार असून रोग, किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हेही वाचा : राज्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता
सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तर ज्वारी कणसाच्या अवस्थेत आहे. यामुळे या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.खरिपातील कापूस, तूर पिकांची काढणी सुरू आहे.फळबागामध्ये द्राक्षे,डाळिंब,अंजीर,ही फळपिके काढणी अवस्थेत आहेत.आंबा फळपीक मोहोरच्या अवस्थेत आहे. मात्र ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामीतल पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढील लागला आहे.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सध्या तूर काढणीचा हंगाम सुरू असून पावसाळी वातावरण त्यास बाधक ठरत आहे.मराठवाड्यातील वातावरणातील बदल पुन्हा एकदा रब्बी पिकांच्या मानगुटीवर बसण्याची चिन्हे आहेत. ढगाळ वातावरण व अधूनमधून होणारा पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहेत. दरम्यान कोल्हार, नगर, सातार, सांगली, सोलापूर, पुणे, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती कामाचे नियजोन कोलमडले आहे.
या पावसाचा सर्वाधिक फटका गुऱ्हाळघरांना बसला असून त्यांची धुराडी थंडावली आहेत. पावसामुळे वाफसा येत नसल्याने ऊसतोडणीही अडखळत सूरू आहेत. ऊस भरलेली वाहने शेतात अडकण्याचा धोका असल्याने सखल भागात ऊसतोडणी रखडली आहे.
Share your comments