1. बातम्या

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित- रक्षा खडसे

जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी, केळी उत्पादक सन २०१९ या वर्षातील बँकांच्या चुकांमुळे पीक विमा पासून वंचित राहिलेले आहेत. पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याबाबत कोणत्याही या प्रकारची आढावा बैठक घेण्यात आलेली नाही.

KJ Staff
KJ Staff


जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी, केळी उत्पादक सन २०१९ या वर्षातील बँकांच्या चुकांमुळे पीक विमा पासून वंचित राहिलेले आहेत.  पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याबाबत कोणत्याही या प्रकारची आढावा बैठक घेण्यात आलेली नाही.  महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे बोलते परंतु महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अपयशी ठरली, असल्याचा आरोप खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

 गुरुवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पीक विमा बाबत बैठक घेण्यात आली, तेव्हा जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, बँकेचे वरिष्ठ अधिकारी व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित होते. जवळ-जवळ ४०० ते ५०० शेतकरी सन २०१९ च्या पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत.

याबाबत बँकांकडून शेतकऱ्यांना आधार कार्ड मध्ये झालेल्या चुका,  नावामध्ये झालेली चूक, आधार क्रमांक चुकीचा असल्याबाबत सांगण्यात येत आहे. त्याचा फटका केळी उत्पादकांना ही न बसता जिल्ह्यातील  कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खासदार रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला. त्या म्हणाल्या की, हे सरकार महाविकास आघाडी सरकार नसून पिछाडी सरकार आहे. शेतक-यांच्या प्रश्नावर आघाडी सरकार अपयशी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान पीक विम्यासाठी कशाप्रकरे अर्ज करायच्या याविषयी आपण जाणून घेऊ.

कसा कराल पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज ( PMFBY )

या योजनेच्या लाभासाठी तुम्ही बँकेतून अर्ज करु शकता परंतु बँकेत न जाता तुम्ही आता ऑनलाईनही या योजनेचा लाभ घेऊ शकता.  यासाठी तुम्हाला https://pmfby.gov.in/.In  या संकेतस्थळावर जावे लागेल.

कोणते कागदपत्र लागतात पीएम पीक विमा  योजनेसाठी

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी आपल्याला काही कागदपत्रे द्यावी लागतात. पॅन कार्ड, आधार कार्ड, चालक परवाना, मतदान कार्ड, आपला रहिवाशी पुरावा, यासह आपल्या पिकांची माहितीसाठी सरपंचाचे पत्र हवे.  आपल्या जमिनीची माहिती सात बारा उतारा, जर आपण दुसऱ्याची जमीन कसत आहोत तर आपले करार पत्र दाखावे लागते. या सगळ्या कागदपत्रांसह एक बाद केलेला धनादेश द्यावा लागतो.

(PMFBY) फॉर्म कुठे मिळेल?

पंतप्रधान पीक विमा योजनेचे फॉर्म (पीएमएफबीवाय) ऑफलाइन (बँकेत जाऊन) आणि दुसरे म्हणजे ऑनलाईनही घेता येतील. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही या लिंकवर जाऊ शकता- http://pmfby.gov.in

जर तुम्हाला फॉर्म ऑफलाइन घ्यायचा असेल तर तुम्ही जवळच्या बँक शाखेत जाऊन पीक विमा योजना (PMFBY) फॉर्म भरू शकता.

(PMFBY) साठी लक्षात ठेवण्याच्या इतर काही गोष्टी:

१. पीक पेरणीच्या १० दिवसांच्या आत, आपण (PMFBY)फॉर्म भरला पाहिजे.

२. पीक घेतल्यानंतर १४ दिवसांदरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे आपले पीक खराब झाले असेल तर आपण अद्याप विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे पीक खराब झाले असेल तरच विमा लाभ मिळू शकेल.

English Summary: Farmers in Jalgaon district deprived of crop insurance - Raksha Khadse Published on: 02 October 2020, 06:10 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters