1. बातम्या

Parbhani News : परभणीत 'झेंडूची फुले अभियानांतर्गत' शेतकऱ्यांचा सन्मान

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा‌ तालूक्यातील ताडकळस येथे लक्ष्मीपुजन निमित्ताने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजनासाठी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना न‌ विकता स्वतःच आपल्या शेती उत्पादीत झेंडूच्या फुलांचा बाजार "झेंडूची फुले अभियान" अंतर्गत भरवला होता.

Parbhani News

Parbhani News

परभणी : परभणी जिल्ह्याच्या पूर्णा‌ तालूक्यातील ताडकळस येथे लक्ष्मीपुजन निमित्ताने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजनासाठी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना न‌ विकता स्वतःच आपल्या शेती उत्पादीत झेंडूच्या फुलांचा बाजार "झेंडूची फुले अभियान" अंतर्गत भरवला होता. शेतक-यांनी मोठे कष्ट लावून फुलवलेल्या फुलांचा भाव न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडूनच ग्राहकांनी व शेतकरी यांनी खरेदी केले.

या प्रसंगी झेंडूची फुले अभियानात येथील शब्दरंग मित्रपरिवार, मराठा सेवा संघ, डॉक्टर्स असोसिएशन, व्यापारी मंच व गावकरी नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून माखणी येथील प्रयोगशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांना हिंगोली येथील झेंडूची फुले अभियानाचे उद्गाते अण्णा जगताप यांच्या कृषी फाऊंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अभियानामार्फत यावर्षीपासून दरवर्षी प्रत्येक ठिकाणी एका शेतकऱ्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

यावेळी सरपंच गजानन आंबोरे सभापती बालाजी रुद्रवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सत्काराला उत्तर देत जनार्धनआवरगंड यांनी आपली भूमिका व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद आंबोरे यांनी तरप्रास्ताविक साहेब शिंदे यांनी केले.यंदाच्या दिवाळीत झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना ६० ते १०० रुपयापर्यंत प्रती किलो दर मिळाला.

विजयादशमीला बाजारात आवक वाढून कवडीमोल दरात झेंडूची विक्री करावी लागली तर कित्येक शेतक-यांनी झेंडूची फुले रस्त्यावर फेकली. त्यामुळे यातून उत्पादन खर्च देखील वसूल झाला नाही. मात्रं या दिवाळीत लक्ष्मीपूजना साठीच्या फुले विक्रीतून थोडाफार दिलासा मिळाला.

English Summary: Farmers honored under Zenduchi Phule Abhiyan in Parbhani Published on: 13 November 2023, 10:35 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters