केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या. येथील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कृषिमंत्र्यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, केंद्रीय कृषि कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा, अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी, राज्याच्या कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, केंद्रीय सहसचिव प्रिय रंजन, केंद्रीय फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार, राज्याचे कृषि आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.
यावेळी चांगली कामगिरी करणाऱ्या कृषि क्षेत्रातील नवउद्यमी (स्टार्टअप्स), अंकुश पडवळे-सोलापुर, रामनाथ बापू वाकचौरे-अहमदनगर, विलासराव शिंदे सह्याद्री ग्रुप-नाशिक या प्रगतशिल शेतकरी उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.
आंदोलनाला यश! पहिली उचल 3100, कारखान्याचे धुराडे सुरू..
यावेळी कृषि उत्पादक संस्था, मूल्य साखळी, बँक प्रतिनिधी, एसएचएम यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 'ऑरगॅनिक पॅकेज ऑफ प्रॅक्टिस फॉर हॉर्टीकल्चर क्रॉप्स' आणि 'मिशन ऑरगॅनिक व्हॅल्यू चेन' या पुस्तिकांचे आणि फलोत्पादन क्षेत्रातील यशकथांच्या संग्रहाचे प्रकाशन व आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात केले.
सणसर येथे ऊस परिषदेचे आयोजन, एफआरपीसाठी राजू शेट्टी आक्रमक
दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना मदत देत दिलासा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
'नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकांची मागणी करणार'
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' तणनाशकावर बंदी, सरकारने घेतला निर्णय..
LIC देत आहे 20 लाख रुपये, घरबसल्या करा असा अर्ज...
Share your comments