कीटकनाशकांचा अतिजास्त वापर केला असल्यामुळे शेतमालामध्ये रासायनिक अंश आढळले आहेत. जे की किडीमध्ये प्रतिकारशक्ती सुद्धा वाढलेली आहे. जे की या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जळगाव मधील कांतिलाल भोमराज पाटील यांनी इकोपेस्ट ट्रॅप तयार केले आहे. कांतीलाल यांना १७ एकर जमीन असून त्यामध्ये भाजीपाला पिके, केळी, कलिंगड, खरबूज लावले जाते. जे की यास प्रकाश तसेच चिकट सापळा असे वापरले जाते. एवढेच नाही तर पिवळ्या रंगाचे शीट देखील वापरले जाते. जे की यामध्ये दिवसा पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडी, मावा तसेच रात्री गुलाबी बोंड अळी, अमेरिकन बोंड अळी व अजून काही किडी चे पतंग ट्रॅप होतात.
मोठा कार्डशीट पेपर जो की विविध रंगाचा असतो तसेच दुसऱ्या शीट चे छप्पर असा त्याचा आकार असतो. यासोबत च इलेक्ट्रॉनिक सर्किट, ०.५ वॅट चा एलईडी बल तसेच दोन पेन्सिल सेल असतात. जे की हे सर्व २५ दिवस कार्यरत राहत असतात. जे की यामध्ये सेन्सर असतात त्यामुळे दिवसा दिवा बंद राहतो आणि जशी जशी रात्र होईल तसा तसा दिव्याचा प्रकाश उजडायला सुरुवात होते. जे की याची किंमन्त प्रति सापळा २०० रुपये आहे. कीटकांची कसलीच हानी पोहचत नाही.
हेही वाचा:-कांडीकोळसा तयार करण्यासाठी पुण्यात नवीन तंत्र विकसित, मात्र उसाच्या पाचट ची भासतेय गरज
सध्याच्या स्थिती पर्यंत कांतीलाल पाटील यांनी शेतकऱ्यानकडे २० हजार जवळपास सापळे पोहचवले आहेत. नाशिक जिल्ह्यातील पिंगळवाडे मधील रोहिदास भामरे यांची येथे तीन एकर शेती आहे जे की नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षऐवजी त्यांनी मिरची, कोबी, टोमॅटो, गिलके, कारले, कलिंगड या प्रकारची पिके घेतली आहेत. आज ते कीटकनाशक न वापरता रंगीत चिकट सापळे तसेच कामगंध सापळे वापरत आहेत. जे की यांनी मागील तीन वर्षांपासून इकोपेस्ट ट्रॅप’ चा वापर सुरू केला आहे.
शेतकऱ्याला झालेले फायदे :-
१. रसशोषक किडी असल्यामुळे कोबी या भाजीवर चौकोनी ठिपक्यांच्या पतंग तसेच मिरची वर अळीचा पतंग, वेलवर्गीय पिकातील फळमशिवर नियंत्रण ठेवले जाते. तुम्ही जर वेळेवर शेतामध्ये सापळे बांधले तर मादीची संख्या कमी होते आणि अंडीपासून जे उत्पादन होते ते देखील कमी होते. कीटकनाशक फवारणी ची संख्या कमी होते आणि खर्च देखील वाचतो.
२. जे की या गोष्टींमुळे उत्पादनात ३० ते ३५ टक्के सुधारणा होते तर फळांची गुणवत्ता देखील वाढवली जाते. बाजारात जो चालू दर आहे त्या दरापेक्षा ३ रुपये जास्त दर यास भेटत असतो. पावसाळा सुरू झाला की पिकांवर फवारणी करण्यास अडचणी निर्माण होतात जे की यावेळी सापळा कार्य करून कीड नियंत्रणात आणतो.
Share your comments