काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. तेव्हा राज्य सरकारने अतिवृष्टीचे (Subsidy) अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्याचे आदेशही दिले होते. हे अनुदान शेतकऱ्यांच्या (Bank Account) खात्यावर जमा झाले होते. मात्र यावेळी संपूर्ण रक्कम मिळाली नव्हती. यामुळे आता राहिलेली रक्कम म्हणजेच २५ टक्के रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये उस्मानाबाद हा पहिला जिल्हा ठरला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याआधी 237 कोटींचे वितरण झाले आहे. तर आता 71 कोटी रुपये वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. तहसीलस्तरावरून सर्व बॅंकांना या पैशाचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे आता हे पैसे जमा झाले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून अनुदानाची रक्कम आणि संबंधित शेतकऱ्यांची यादी ही बॅंकांना देण्यात आली आहे. ही प्रक्रिया उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे सोमवारपासून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. सध्या इतर जिल्हातील शेतकरी या मदतीची वाट बघत आहेत.
यामुळे आता गरजेच्यावेळी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी शेतकऱ्यांचे खाते क्रमांक तपासणी, आधार क्रमांक या सर्व बाबी तपासून घ्याव्या लागत होत्या. पण आता सर्व काही तयार आहे. तहसीलस्तरावरुन पैसे बॅंकांना वितरीत होताच ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. यामुळे आता पहिला डाटा असल्याचे वेळ लागणार नाही. यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकरच पार पडली आहे.
या मदतीमध्ये जिरायतीसाठी प्रति हेक्टरी 10 हजार, बागायती क्षेत्रासाठी 13 हजार तर फळबागा आणि बहुवार्षिक पिके असलेल्या शेतीसाठी 25 हजार रुपये हेक्टरी अशी घोषणा करण्यात आली होती. असे असताना पहिल्या टप्प्यात 75 निधीचे वितरण झाले होते तर आता राहिलेला निधी बॅंक खात्यावर जमा केला जात आहे. 22 फेब्रुवारी रोजीच्या आदेशाने हा निधी बॅंक खात्यावर जमा होणार आहे. आजपासून प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे जमा होतील असे सांगितले जात होते.
Share your comments