भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural country) आहे, आपल्या देशात निम्म्याहून अधिक जनसंख्या कृषी क्षेत्राशी निगडित आहे. देशाची अर्थव्यवस्था देखील कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. आणि म्हणूनच देशातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी व शेतकरी राजांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवण्यासाठी शासन दरबारी अनेक उपाययोजना अमलात आणल्या जातात. या योजनांचा शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होतांना देखील दिसतो आहे. शासनाने व्यतिरिक्त देशातील अनेक बँका शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना राबवित असतात. देशातील अनेक बँका शेतकर्यांना सुलभरित्या कर्ज पुरवठा व्हावा म्हणुन अनेक उपाययोजना करत असतात. अशाच एका योजने पैकी एक योजना आहे "स्टार किसान घर योजना" ही योजना देशातील प्रमुख बँकांपैकी एक असलेली बँक ऑफ इंडिया (Bank of India) या बँकेने सुरू केली आहे. बँक ऑफ इंडिया च्या योजनेद्वारे शेतकरी बांधवांना घर बनवण्यासाठी व जुने घराची दुरुस्ती करण्यासाठी कर्ज (Loans to farmers for building houses and repairing old houses) उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी बांधवांना या योजनेद्वारे तब्बल 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
स्टार किसान घर योजना नेमकी आहे तरी काय
स्टार किसान घर योजना (Star Kisan Ghar Yojana) बँक ऑफ इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना घर बनवण्यासाठी व जुन्या घराची दुरुस्ती करण्यासाठी लोन उपलब्ध करून दिले जाते. बँक ऑफ इंडिया द्वारे दिल्या जाणाऱ्या या कर्जाला अगदी कमी व्याजदर लावण्यात आला आहे. तसेच या योजनेद्वारे दिले जाणाऱ्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना पुरेसा वेळ देखील देत असते.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ
बँक ऑफ इंडियाच्या या योजनेचा लाभ शेतकरी बांधवांना आपल्या शेतजमिनीवर घर बनवण्यासाठी आणि घराची दुरुस्ती करण्यासाठीच दिला जातो. या योजनेचा लाभ त्याच शेतकऱ्यांना दिला जातो ज्या शेतकऱ्यांचे बँक ऑफ इंडिया मध्ये केसीसी अकाउंट असते.
या योजनेद्वारे किती मिळणार कर्ज
बँक ऑफ इंडियाच्या या महत्वकांक्षी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपासून ते पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवले जाते. शेतकरी बांधवांना आपल्या शेतजमिनीवर नवीन फार्महाउस ची निर्मिती करण्यासाठी बँक ऑफ इंडिया एक लाख रुपयांपासून ते पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवीत असते. याव्यतिरिक्त बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना जुन्या घराची दुरुस्ती करण्यासाठी तसेच नवीन घर निर्माण करण्यासाठी एक लाख रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देखील पुरवीत असते. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या कर्जावर 8.05 टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. या योजनेद्वारे प्राप्त होणाऱ्या कर्जाची परतफेड शेतकरी बांधव 15 वर्षात करू शकता.
शेतकरी बांधव या योजने संदर्भात अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत भेट देऊ शकता तसेच बँक ऑफ इंडियाच्या 1800 103 1906 या टोल फ्री क्रमांकाला देखील संपर्क करून या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.
Share your comments