1. बातम्या

कामाची बातमी: रानडुकरांना पळवण्यासाठी शेतकऱ्यानी केली अनोखी आयडिया; कायमचा केला नायनाट

शेतकरी आपल्या जीवाचे रान करत शेतात पेरलेले पीक उभे करतो. मात्र, कधी नैसर्गिक तर कधी वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाल्याचे अनेकदा दिसून येतं. मात्र अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पिकांची नासाडी करणाऱ्या जंगली डुकरांपासून पीक वाचवलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यानं चक्क भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
रानडुकरांना पळवण्यासाठी शेतकऱ्यानी केली अनोखी आयडिया

रानडुकरांना पळवण्यासाठी शेतकऱ्यानी केली अनोखी आयडिया

शेतकरी आपल्या जीवाचे रान करत शेतात पेरलेले पीक उभे करतो. मात्र, कधी नैसर्गिक तर कधी वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाल्याचे अनेकदा दिसून येतं. मात्र अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पिकांची नासाडी करणाऱ्या जंगली डुकरांपासून पीक वाचवलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यानं चक्क भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील शिरसगाव बंड येथील शेतकरी मनोज निंभोरकर यांनी आपल्या शेतात दोन वर्षांपासून रानडुकरापासून हरभरा बियाण्याचा बचाव करण्याची नवीन शक्कल लढवली. या शेतकऱ्याने पेरणीपूर्वी आपल्या हरभरा बियाण्यावर अंघोळीला वापरण्यात येणारे शाम्पू लावून ते उन्हात वाळविले.

त्यानंतर त्या बियाण्यावर कीड प्रतिबंधक औषधी व रसायने लावून शेतात पेरणी केली. रानडुकरांनी शेतात शिरून बियाणे खाण्याचा प्रयत्न केला असता, शाम्पूमुळे त्यांच्या तोंडात फेस होतो. यामुळे कन्फ्यूज झालेले रानडुकर शेत सोडून पळू लागले. हा यशस्वी प्रयोग त्यांनी गतवर्षी सर्वप्रथम केल्याने त्यांचे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत नगण्य नुकसान झाले.

यावर्षीसुद्धा त्यांनी हाच प्रयोग आपल्या हरभरा पेरणीच्या वेळी केल्यामुळे अद्याप त्यांच्या हरभरा बियाण्याचे शेतात नुकसान झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, इतर शेतकऱ्यांना मात्र रानडुकरांपासून बियाणे नुकसानीचा मोठा फटका बसला आहे.

राष्ट्रीय दूध दिवस 26 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या त्यामागील रंजक कथा

शेतकऱ्यांनी हा प्रयोग केल्यास शेतात होणाऱ्या हरभरा बियाण्याच्या नुकसानापासून बचाव होऊ शकतो, असा ठाम विश्वास मनोज निंभोरकर यांनी दर्शविला असून त्यांनी शेतकऱ्याना हा वापरण्याचे आवाहन केले आहे.

आता या लोकांना मिळणार मासिक ३ हजार रुपये पेन्शन! वाचा सर्व तपशील

English Summary: Farmers came up with a unique idea to drive away wild boars Published on: 26 November 2022, 01:20 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters