मुंबई, शेतकऱ्यांच्या मागे लागलेली संकटे अजूनही कमी होताना दिसत नाहीत. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. आता संपुर्ण महाराष्ट्र (maharashtra) राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather department) व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके लवकर काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे शेतकरी पळापळ करत आहेत. अनेकांची पीकं काढणीला आली असल्याने शेतकऱ्यांना (farmer) मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या गारपिटीची होण्याची देखील शक्यता आहे. यावेळी हवेचा वेग वाढणार असून ताशी 40 कि.मी वेगाने वार वाहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे कोरोनाच्या परिस्थितीतुन सावरत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, राजस्थान,गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आले. यामुळे नुकसानीची भीती शेतकऱ्यांना आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली होती, त्यातून शेतकरी सावरताना दिसत होता. पण सध्याच्या खराब हवामानाने त्यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याची पाहायला मिळत आहे. यामुळे गहू, हरभरा, तसेच अनेक फळबागा यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे आता शेतकरी चिंतेत आहेत. सध्या गारपीठीसह महाराष्ट्रात पाऊस झाल्यास गहू, हरभ-यासह अनेक पीकांना त्याचा फटका बसेल. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना काय करावे असा प्रश्न पडला आहे. यामुळे येणाऱ्या दोन दिवसात काय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हवामान खात्याचा अंदाज खालीलप्रमाणे;
मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या गारपिटीची शक्यता. मध्य भारतात पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान,गुजरात,पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Share your comments