सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. यामुळे शेतात बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. असे असताना आता बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली एमआयडीसी परिसरातील गोडाऊनमध्ये अवैधरित्या सोयाबीन बियाणे साठवून ठेवल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. यामुळे मोठी कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे बियाणे निरीक्षक विजय खोंदील यांनी आपल्या पथकासह चिखली एमआयडीसी परिसरात चौकशी केली. नंतर राणाजी सीड्स आणि ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद या गोडाऊनवर छापा मारण्यात आला. यामध्ये ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद अशा लिहिलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या बॅग आढळून आल्या.
या संदर्भात संबंधित व्यक्तींना कागदपत्राची मागणी केली असता त्यांनी कुठलेही अधिकृत कागदपत्रे सादर केली नाही. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोडाऊनमधील बॅग जप्त केल्या. यामुळे आता शेतकऱ्यांना खरे बियाणे कोणते आणि खोटे कोणते असा प्रश्न पडला आहे.
या कारवाईमध्ये 925 क्विंटल सोयाबीन, इलेक्ट्रिक वजन काटे, मशीन आणि इतर साहित्य असा एकूण 1 कोटी 21 लाख 5 हजार 150 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बियाणे अधिनियम आणि भारतीय दंड संहितेनुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांनी माहिती दिली.
महिंद्राचा हा ट्रॅक्टर सर्वात शक्तिशाली! आधुनिक आणि प्रगत सुविधांनी सुसज्ज
याबाबत गणेशराव सोळंकी, संदीप बावीस्कर, अजित मुळे, मधुकर मुळे या चार जणांविरोधात नियमबाह्य सोयाबीन बियाण्यांचा साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता हे बियाणे कुठे कुठे विक्री झाले आहे. याची माहिती घेतली जात आहे.
अरबी समुद्रात मॉन्सून दाखल, लवकरच राज्यात दाखल होण्याची शक्यता..
ज्यादा दराने विक्री, बोगस खते विक्री करणे आले अंगलट, नगरमध्ये तीन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित..
ज्यादा दराने विक्री, बोगस खते विक्री करणे आले अंगलट, नगरमध्ये तीन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित..
Share your comments