नांदेड
लोहा तालुक्यातील ट्वेंटीवन शुगर लिमिटेड युनिट नंबर ३ या साखर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकरी तीव्र नाराज आहेत. हा कारखाना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या सुपुत्राचा आहे.
गळीत हंगाम २०२३ मध्ये पूर्णा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी या कारखान्याने नेला. पण या कारखान्याने प्रतिटन २२०० रुपये प्रमाणे बील काढत शेतकऱ्यांची बोळवण केली.
ट्वेंटीवन शुगर लिमिटेड साखर कारखान्याच्या तुलनेत पूर्णा सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना २६०० रुपये भाव दिला. तर यानंतर प्रतिटन २५० भाव देणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ट्वेंटीवन शुगरला ऊस दिला त्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला, असे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ट्वेंटीवन शुगर कारखान्यावर मोर्चा काढणार असल्याचे ऊस उत्पादक शेतकरी बांधवांकडून बोलले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कारखाना शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित रक्कम जमा करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Share your comments