खरीप हंगामातील पिकांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झालेच आहे पण त्याचबरोबर अवकाळी पाऊसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे. मुख्य1पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी निराशा व्यक्त करत आहेत. उत्पादनवाढीसाठी शेतकरी नवीन नवीन प्रयोग करत आहेत. अकोला जिल्ह्यात एका बाजूला रब्बीचा पेरा तर दुसऱ्या बाजूला कलिंगड लागण सुरू होती. सध्या रब्बी हंगामातील पिकांची जोमाने वाढ होत आहे तर दुसरीकडे कलिंगडाची काढणी सुरू आहे. ज्या कलिंगडाला दोन महिने झाले आहेत ते शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्यासाठी तयार झाले आहेत. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी च नागरिकांची कलिंगडाला मोठी मागणी असते.
डिसेंबरमध्ये लागण अन् फेब्रुवारीमध्ये काढणी :-
कलिंगड या पिकाला हंगामी पीक म्हणले जाते जे की खूप वर्षांपूर्वी नदी पात्रात कलिंगड लावले जायचे. पण हळूहळू सिंचनाद्वारे तसेच निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये शेतकरी कलिंगड फळाची लागवड केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कलिंगडाची लागवड केली जात आहे. अकोला जिल्ह्यात सध्या ३००० हेक्टरवर कलिंगडाची लागवड केली आहे जे की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कलिंगडाची आवक सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
लागवडीपूर्वीच बाजारपेठेचा बांधला जातो अंदाज :-
आता शेतकरी फक्त उत्पादनाच्या दृष्टीने पीक घेत नाही तर बाजारपेठेचा अभ्यास करून शेतकरी पीक घेत आहे. त्या पिकातून चार पैसे मिळतील असे पीक शेतकरी घेत आहेत. उन्हाळ्यात कलिंगडाला मोठ्या प्रमाणात मागणी असते जे की या अनुषंगाने डिसेंम्बर मध्ये कलिंगडाची लागवड केली जाते आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात कलिंगडाची तोडणी केली जाते. या सर्व बाबींचा विचार तसेच नागरिकांचा विचार करून मागणी मोठी असणार आहे असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.
दराबाबत शेतकऱ्यांना विश्वास :-
उन्हाळ्यात कलिंगडाला मोठी मागणी असते जे की प्रति वर्षी मोठ्या प्रमाणात मागणी असते. नोव्हेंबर तसेच डिसेंम्बर महिन्यात अगदी कडाक्याच्या थंडीत सुद्धा कलिंगडाला मोठी मागणी होती. सध्या १ कलिंगडाचा दर ३० रुपये असा आहे. सध्या कोरोनाचे वातावरण निवळल्यामुळे मागणी जोरात आहे असा अंदाज शेतकऱ्यांनी लावलेला आहे. दरवर्षी जशी कलिंगडला मोठ्या प्रमाणात मागणी असते तशी यावर्षी सुदधा व्हावी असे शेतकऱ्यांचे मत आहे.
Share your comments