पीक विम्यापासून अजूनही शेतकरी वंचीत आहे, यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकरी नेते रविकांत तुपेकर आंदोलन करत आहेत. ते म्हणाले, उर्वरित शेतकऱ्यांच्या पिकविम्यासंदर्भात आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत जिल्हा कृषि अधीक्षकांच्या दालनात ठिय्या मांडला. अजूनही जिल्ह्यातील ५० ते ७० हजार शेतकरी हे पिकविम्यापासून वंचित आहे. AIC पिकविमा कंपनी वेळकाढू पणाचे धोरण राबवित आहे.
त्यामुळे आज आक्रमक पवित्रा घेत तातडीने उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा करण्यासाठी कंपनीला बाध्य करावे, अशी मागणी रेटून धरली. तसेच यासंदर्भात राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा. एकनाथजी डवले साहेब यांच्याशीही दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. आम्ही घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा कृषि अधीक्षकांनी पुढील आठवडाभरात पिकविमा जमा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.
जर दिलेले आश्वासन कृषिविभागाने व कंपनीने पळाले नाही, तर मात्र पुढच्या वेळचे आंदोलन हे अधिक आक्रमक असेल व ते प्रशासनाला न परवडणारे असेल. शेतकऱ्यांसाठी मी कितीही वेळा तुरुंगात काय फासावरही जायला तयार आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
माजी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! आता शेतकरी मुलाशी लग्न केल्यास 2 लाख रुपये मिळणार...
कृषि विभागात केलेल्या आंदोलनानंतर लगेच बुलढाणा जिल्हाधिकारी मा.डॉ.ह.पी.तुम्मोड यांची भेट घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील ५० ते ७० हजार शेतकरी अजूनही पिकविम्यापासून वंचित आहेत. आम्ही सातत्याने केलेल्या आंदोलनामुळे आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्या पोटी १५९ कोटी रुपये कंपनीकडून मिळाले, परंतू बरेच शेतकरी अजूनही पिकविम्यापासून वंचित आहेत.
भीमा पाटस कारखान्याप्रकरणी संजय राऊत यांची 26 एप्रिलला दौंडला होणार सभा, होणार मोठा गौप्यस्फोट
त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा मिळवून देण्याची मागणी त्यांच्याकडे केली. तसेच अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून बरेच शेतकरी वंचित आहेत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरही तातडीने अतिवृष्टी नुकसान भरपाई टाकण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
भारतीय शेतीतील सिंचन व्यवस्थापन
राज्यात विकास सोसायट्यांचे जाळे वाढणार, २ लाख संस्था स्थापन करणार, केंद्राचा निर्णय..
राज्यात आज 'या' ठिकाणी गारपिटीचा होणार, हवामान खात्याचा इशारा..
Share your comments