1. बातम्या

देशात जोपर्यंत किमान हमीभाव कायदा लागू होत नाही, तोपर्यंत शेतकरी आर्थिक संकटात : राजू शेट्टी

Raju Shetti: देशाला अन्न धान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर करत असताना शेतकरी मात्र देशोधडीला लागत आहे. देशातील 80 टक्के शेतकरी हे अल्पभुधारक आहेत. त्यामुळं किमान हमीभावाचा कायदा लागू करावा अशी भूमिका शेट्टींनी मांडली.

Raju Shetti

Raju Shetti

Raju Shetti: देशाला अन्न धान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर करत असताना शेतकरी मात्र देशोधडीला लागत आहे. देशातील 80 टक्के शेतकरी हे अल्पभुधारक आहेत. त्यामुळं किमान हमीभावाचा कायदा लागू करावा अशी भूमिका शेट्टींनी मांडली.

दिल्लीतील पंजाब खोर इथे आयोजित करण्यात आलेल्या MSP गॅरंटी किसान मोर्चाच्या अधिवेशनात राजू शेट्टी बोलत होते. MSP कायद्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील सहभाग नोंदवला आहे.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील 460 ग्रामपंचातीच्या गावसभेमध्ये देशाच्या संसदेत हमीभावाचा कायदा मंजूर करावा तसेच राष्ट्रपतींनी तसा त्यांना आदेश द्यावा असे ठराव एकमताने मंजूर केला आहे. लवकरच हे ठराव राष्ट्रपतींना सुपुर्द करणार असल्याची माहिती देखील राजू शेट्टींनी यावेळी दिली.

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आखली रणनीती; आता...

स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात संसदनं अनेक कायदे केले ते अधिकारी व मंत्र्याच्या इच्छेखातर. मात्र, इतिहासात प्रथमच 2017 पासून किमान हमीभावाच्या कायद्यासाठी शेतकरी रस्त्यावरची लढाई लढत असल्याचे राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

ब्रेकिंग! पक्षचिन्हासोबत आता थेट पक्षाध्यक्षपदावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरणं राबवून शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे. संपुर्ण देशातील शेतकरी ही लूट थांबवण्यासाठी संघटित झालेला आहे.

यामुळं याआधी संसद मार्ग आणि जंतर मंतरवर सुरु झालेली ही लढाई आता शेतकऱ्यांच्या थेट बांधावर आणलेली असून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तसेच गुजरातपासून आसामपर्यंतचा शेतकरी या लढाईत समाविष्ट झाला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

English Summary: Farmers are in financial crisis until the guarantee law is implemented Published on: 07 October 2022, 05:10 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters