राज्यातील महा विकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची महात्मा ज्योतीबा फुले या योजनेअंतर्गत कर्जमाफी केली त्यावेळी ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये देण्याचे देखील जाहीर केले होते.
मात्र, आता या घोषणेला जवळपास दोन वर्षांचा काळ उलटला आहे तरीदेखील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अजून एक छदामही सरकारने मारून फेकलेला नाही. कोरोना महामारी मुळे राज्य सरकारच्या महसूलात मोठा तुटवडा जाणवला होता. परिणामी राज्य सरकारने मागील दोन वर्षात दीड लाख कोटीहून अधिकचे कर्ज काढले. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशि देण्यास विलंब झाला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना सांगितले.
राज्य सरकारवर आधीच कर्जाचा बोजा असल्याने, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय त्या काळात कार्यान्वित करता आला नाही. कोरोना काळात ज्याप्रमाणे राज्य सरकार कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले अगदी त्याच पद्धतीने बळीराजा देखील मागील दोन वर्षात भरडला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचा आग्रहदेखील धरला जात होता.
शेवटी आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये प्रोत्साहनपर राशी देण्यासाठी राज्य सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सुमारे दहा हजार कोटींची तरतूद केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जर सर्व व्यवस्थित राहिले तर येत्या महिन्यापासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये वाटप सुरू होऊ शकते. आता पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये कधी हस्तांतरित केले जातात हे विशेष बघण्यासारखे असेल.
हेही वाचा:-
Saffron Farming: केसर लागवड म्हणजेच करोडोंचा फायदा; जाणुन घ्या केसर लागवडविषयी काही महत्वाची माहिती
महत्वाची बातमी! 'या' लोकांचे रेशन कार्ड होणार बंद; जाणून घ्या काय आहे नेमकं कारण
Share your comments