अवकाळी पाऊस आणि गारपीठ याचा फाटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. पिकाला केलेला उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचा पदरी निराशा पडत आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. २०२१ मध्ये सर्वाधिक ३५६ शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्याप्रवण १४ जिल्हे येतात.
शेतकरी आत्महत्या कारणे
अवकाळी पाऊस आणि गारपीठ यामुळे पीक येत नाहीत. यामुळे खासगी सावकारांचे कर्ज वाढले आहे. नैसर्गिक आपत्ती, नापिकी वाढली आहे. मुला - मुलींचे शिक्षण व लग्न कसे करावे, या चिंतेत बाळी राजा आहे. त्याचबरोबर शेतकरी आत्महत्यांमध्ये केवळ कर्जबाजारीपणाच कारणीभूत नाही, तर काही प्रकरणांमध्ये विविध आजार, कौटुंबीक वाद, व्यसनाधीनता, बेरोजगारी व गरिबी आदी घटकही जबाबदार असल्याचे निरीक्षण पुढे आले आहे. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना गरजू शेतकऱ्यांना मिळत नाहीत. शेतकरी आत्महत्या होऊ नयेत , यासाठी सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यानिहाय शेतकरी आत्महत्या संख्या
अमरावती ३५६
यवतमाळ २९९
बुलढाणा २८५
बीड २१०
औरंगाबाद १७२
अकोला १३८
उस्मानबाद १२६
नांदेड ११९
परभणी ८३
जालना ७९
लातूर ६४
वाशिम ७५
हिंगोली ३६
Share your comments