शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. कांदा मालाचे दर एकीकडे कमी होत आहेत. तर दुसरीकडे कांदा मार्केट बंद आहे. शेतकऱ्यांकडूनच (Onion Market) कांदा मार्केट बंद करण्यात आले आहे. हो सत्य आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
लासलगाव बाजार समितीत दररोज हजारो वाहनांची येजा असते. यामध्ये ट्रॅक्टर, पिकअप वाहनातून कांदा विक्रीला घेऊन येत असतात. निफाड तालुक्यातील लासलगाव जवळ असलेल्या टाकळी विंचूर गावातील कांदा उत्पादक शेतकरी सुरेश बाबाजी काळे यांनी सोमवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान कांद्याने भरलेला ट्रॅक्टर टायली लिलावासाठी आणला होता.
जेवणासाठी घरी गेले असता त्याच दरम्यान अज्ञात चोरट्याने कांद्याने भरलेली ट्रॉली सोडून ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली. याबाबत बाजार समिती जवळ पाठपुरावा केला असता, बाजार समितीत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद तर अस्पष्ट होते. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवत संबंधित शेतकऱ्यास मदत देण्याची भूमिका इतर शेतकऱ्यांनी घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
कामाची बातमी : गांडुळ शेती व्यवसाय सुरू करा, कमवा दरमहा 5 लाख रुपये
सरकारचा मोठा निर्णय! आता घरपोहच मिळणार रेशन
सर्वसामान्यांना चटका! रशिया युक्रेन युद्धामुळे खाद्य तेलाचे दर गगनाला
प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळेच शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीला गेला. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा यामध्येच कांद्याला कवडीमोल दर आणि यातच शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या दिला होता. त्यामुळे काही काळ व्यवहार ठप्प होते.
महत्त्वाच्या बातम्या :
PM Kisan Samman Nidhi: 11 व्या हप्त्यासाठी, लाभार्थी यादीतील नाव "या" प्रमाणे तपासा
Business Idea : कमी गुंतवणूक, लाखोंची कमाई; करा 'हा' व्यवसाय
Kisan Credit Card: शेतकरी शेतीव्यतिरिक्त "या" कामांसाठी KCC कडून कर्ज घेऊ शकतो
Share your comments