सध्या शेतकरी आणि महावितरण यांच्यात विजेवरून संघर्ष सुरू आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. माळेगाव (पिंप्री) गावात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
असे असताना एका ८० वर्षाच्या वृद्ध महिलेने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. (Farmers) शेतकऱ्यांची दुरावस्था पाहून सत्तारांनी तिथूनच थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन लावला.
शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत एकही रोहित्र वरून शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करू नका, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आम्हाला तुमची वीज नको आणि आमच्या शेतात तुमचा खांब नको! शेतकऱ्यांनी महावितरणला आणले जाग्यावर..
सध्या शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणकडून सुरू आहे. यावेळी खरिपाच्या पिकांचे झालेले नुकसान यामुळे शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत वीज पुरवठा खंडित करू नका, असे आदेश कृषीमंत्री अब्दुल सत्तार Abdul Sattar यांनी अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, कृषीमंत्र्यांच्या सोयगांव मतदारसंघात देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रब्बीत तरी पिके जोमात येतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र वीज नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
ब्रेकिंग!नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
थकबाकीमुळे महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईमुळे शेतकरी हताश झाला आहे. यामुळे कृषिमंत्र्यांच्या या आदेशामुळे महावितरणला लगेच कारवाई थांबवावी लागली आहे.
महत्वाच्या बातम्या;
रोजगार मेळावा प्रारंभ, 75 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरीत, मोदींची घोषणा..
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा कहर, 162 ठार शेकडो जखमी..
Vst शक्ती MT 932DI ट्रॅक्टर लहान शेतकऱ्यांसाठी एक चमत्कार, शेतकऱ्यांना होतोय फायदा..
Share your comments