गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे. कांदा उत्पादकांना मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या प्रमाण देखील वाढले आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी किमान 1 हजार 500 ते 2 हजार रुपये आधारभूत किमतीला खरेदी करावा तसेच विकलेल्या कांद्याला क्विंटल मागे 500 अनुदान द्यावे अशा मागण्या शेतकरी आणि प्रहारच्या माध्यमातून करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरावरुन शेतकरी किंवा शेतकरी संघटना ह्या आक्रमक भूमिका घेत आहेत. कांद्याच्या दरात वाढ करण्यात यावी यासाठी जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील मुख्य मार्गावर रास्ता रोको करुन काही रोष व्यक्त केला. कांद्याला किमान दर मिळावा, कांदा साठवूकीसाठी यंत्रणा उभारावी अशा मागण्याही रास्ता रोको मध्ये करण्यात आली.
कांदा उत्पादकाची मागणी काय
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कांद्याच्या भावात घसरण सरूच आहे. कांदा उत्पादकांना असले दल्या कवडीमोल भावामुळे उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या प्रमाण देखील वाढले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी किमान दर तरी द्यावा. दरम्यान राज्यातील मुख्य बाजारपेठेतून नाफेडच्या माध्यातून कांदा खरेदी सुरू आहे. भविष्यात कांद्याचे दर वाढले तर हा नाफेडकडील कांदा बाजारपेठेत आणून दर नियंत्रित केले जातात.
हेही वाचा : 21 हजाराला विकला जातोय फक्त एक आंबा, या आंब्याची राज्यात चर्चा...
मात्र, सध्या जी नाफेडकडून खरेदी केली जात आहे. त्यामध्ये देखील अनियमितात आहे. त्यामुळे सर्व देशभरात नाफेडने एकाच किंमतीमध्ये शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी कारावा अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.
Share your comments