कृषी विधेयका विरोधात सुरू असलेले आंदोलन शेतकऱ्यांनी आता दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एक ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी देशव्यापी रेलरोकोची हाक दिली आहे. पंजाबमधील अमृतसर येथील शेतकऱ्यांचा आताही रेलरोको सुरू आहे. तसेच सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी विधेयकांविरोधात राज्यातील वेगवेगळ्या भागांत शेतकरी आंदोलने सुरू आहेत.
पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या रेलरोकोचा आजचा पाचवा दिवस आहे. तसेच या शेतकऱ्यांनी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत वाढवल्याची घोषणाही केली आहे. शेतकरी-कामगार संघर्ष समितीच्या बॅनरअंतर्गत आंदोलन करणारे शेतकऱ्यांचा २४ सप्टेंबरपासून जालंधर, अमृतसर, मुकेरियां आणि फिरोजपुरमध्ये रेलरोको सुरू आहे. १ ऑक्टोबरपासून मालवा विभागातील शेतकरी संघटनांनी रेलरोको सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगाना, गुजरात, गोवा, ओडिशा आणि तमिळनाडुमध्येही शेतकऱ्यांसोबतच काँग्रेस आणि विरोधी पक्षही आंदोलनात सहभागी झाले आहेत.
दरम्यान कृषी विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन २४ सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आले होते. पंजाब आणि हरियाणासह इतरही राज्यातील शेतकऱ्यांचे असं मत आहे की, या कायद्यामुळे शेतीमाल खरेदी करण्याचे संपूर्ण काम कंपन्यांना देण्यात येईल आणि एमएसपी यंत्रणा संपुष्टात येईल.
Share your comments