मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या गारपीटीमुळे औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कन्नड तालुक्यासाठी तीन कोटी ४० लाख १,५४२ रुपये मदत निधी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
कन्नड तालुक्यातील चिंचोली (लिं.), करंजखेडा, नाचनवेल, कन्नड व चापानेर या पाच महसूल मंडळातील २२ गावांना २० मार्च पासून सतत चार दिवस अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला होता.महसूल व कृषि विभागाच्या वतीने या नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील सात हजार २९५ शेतकऱ्यांचा समावेश असून जिरायत क्षेत्रासाठी ६ हजार ८००, बागायत साठी १३ हजार ५०० तर फळ पिकासाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार आहे.
तालुक्यात पात्र शेतकरी ७ हजार २९५ असून यामध्ये जिरायत क्षेत्र व कंसात रक्कम, क्षेत्र ८४०.८९ हेक्टर ५७ लाख १८ हजार ० ५२ रुपये, बागायत क्षेत्र २,०९४.५४ हेक्टर दोन कोटी ८२ लाख ७६ हजार २९० रुपये , फळपिके ४० आर ७ हजार २०० रुपये असे एकूण ३ कोटी ४० लाख ०१ हजार ५४२ रुपये एकूण मदत निधी प्रस्ताव अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आले असल्याची महसूल विभागातील सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
या प्रस्तावावर तहसीलदार संजय वारकड, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक , गटविकास अधिकारी डॉ श्रीकृष्ण वेणीकर यांच्या स्वाक्षरीने वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.
Share your comments