काही महिन्यांपूर्वी राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. असे असताना आता या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कृषी विभागाच्या नुकसानीच्या अहवालानंतर राज्य सरकारने आर्थिक मदतची घोषणाही केली. पहिल्या टप्प्यात मंजूर निधीपैकी 75 टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. आता राहिलेला २५ टक्के निधी देखील आता या शेतकऱ्यांना मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 234 कोटी रुपये मिळाले होते तर आता 74 कोटी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला होता. तर सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. दोन-तीन दिवसांमध्ये ही रक्कम प्रशासनाकडे जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले आहे. यामुळे पुढील पिकासाठी याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
त्यावेळी राज्य सरकारने लगेच मदतीची घोषणा केली मात्र, प्रत्यक्ष वाटपाकडे दुर्लक्ष झाले. दोन महिन्याने पहिल्या टप्प्यातील रक्कम ही दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाही झाली. मात्र, घोषणेच्या 75 टक्केच रक्कम वितरीत करण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलने केली. यामुळे त्यांच्या या आंदोलनाला आता यश मिळाले आहे. तसेच यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील पाठपुरावा केला होता. बॅंक खाते आणि इतर बाबींची तपासणी यापूर्वीच झालेली आहे. यामुळे ही रक्कम लवकरच मिळणार आहे.
चार दिवसांमध्ये ही रक्कम जमा होताच वितरीत केली जाणार आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला होता. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत होते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 12 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले होते. तसेच नदीकाठच्या जमिनीचे नुकसान झाले होते.
Share your comments