शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार अनेक वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेत आहे. याच धर्तीवर मोदी सरकारने शेतीची कामे सोपी करण्यासाठी एक मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. या ॲपचे नाव कृषी किसान ॲप असून केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी हे ॲप लॉन्च केले आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरणार आहे. यामुळे सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांना घरी बसून मिळणार आहे.
कृषि किसान ॲप (Krishi Kisan App)
कृषी किसान ॲपमध्ये सरकारकडील जिओ-टॅग युक्त पीक डेमो शेती आणि बीज केंद्र आदींची माहिती आहे. या ॲपच्या साहाय्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या मते, बियांचे मिनी किट बिजांची संख्या वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना वाटण्यात येत आहे. मिनी किट आता जिओ- टॅग युक्त आहेत. यामुळे सरकारला मिनी किटचा उपयोग होत आहे का नाही याची माहिती मिळणार आहे.
कृषी किसान ॲपचे फायदे
शेतीचे वैज्ञानिक डेमोस्ट्रेशन : यातून शेतकऱ्यांना आपल्या क्षेत्रातील वैज्ञानिक शेतीच्या डेमोस्ट्रेशनची माहिती मिळेल. परिसरात कुठे वैज्ञानिक पद्दधतीने शेती केली जाते, याची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासह इतर राज्यातील कोणत्या पिकांचा डेमो केला जात आहे, याची माहिती मिळेल. यशस्वी शेतीचा डेमो पाहून आपण ही तशीच शेती करू शकाल.
सीड हब : कृषी किसान ॲपमध्ये देशभरातील बियांची माहिती आहे. यातून शेतकऱ्यांना देशातील १५० सीड हबची माहिती मिळू शकणार आहे. शेतीतील तज्ज्ञ आपल्याला डाळींच्या उत्तम दर्जाचे बीज देऊन उत्तम शेती करण्याचे मार्गदर्शनही तज्ज्ञ करतील. यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
मिनी किट डिस्ट्रब्यूशन : सरकार कमी पैशात चांगल्या प्रतीच्या बिया आणि खाद्य उपलब्ध करुन देते, याची कल्पना बऱ्याच शेतकऱ्यांना नसते. आपल्या जिल्ह्यात या सुविधा कधी आणि केव्हा मिळतील याची माहिती शेतकऱ्यांना या ॲपच्या मदतीने मिळेल.
Share your comments