राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊसाचे पीक घेतले जाते. शिवाय शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी या पिकाला प्राध्यान देतो. मात्र, ऊसाच्या पिकांमध्ये बिबट्याचा वावर कमालीचा वाढला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची चांगलीच दहशत पसरली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड जवळ मस्करवाडी परिसरात शेतशिवारात चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. रामचंद्र रघुनाथ सूर्यवंशी हे चारा काढत असताना कडब्याच्या गंजीआड लपलेल्या बिबट्याने हल्ला केला.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी शेतशिवारात जाण्यासाठी भयभीत झाले आहेत. सूर्यवंशी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माऊली कडी नावाच्या शिवारात चारा आणण्यास गेले होते. बिबट्याने सूर्यवंशी यांच्या हातावर, तोंडावर व पोटावर पंजा मारून जखमी केले आहे. यावेळी प्रतिकार वाढल्याने बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली. वनविभागाचे चोरे येथील वनरक्षक ए.एम.जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
तसेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील लोंढे मळ्यातदेखील बिबट्याचे बछडे आढळून आले आहेत. येथील पंढरीनाथ नामदेव लोंढे यांच्या शेतातील उसाची तोडणी सुरू असताना सकाळी पावणेसातच्या दरम्यान ऊस तोड कामगारांना बिबट्याचा एक बछडा दिसून आला. सध्या या परिसरात ऊस तोडणीची कामे सुरू आहे. यावर लगेच तासाभरात आणखी दोन बछडे आढळून आले हे बछडे साधारण दोन ते अडीच महिने वयाचे असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
आदल्या दिवशी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऊसतोड कामगार महिलांना याच शेतात बिबट्या दिसला होता. त्यामुळे परिसरात बिबट्या मादी असण्याच्या शक्यतेने ऊस तोडणीचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये देखील घबराट पसरली आहे. तर काही दिवसांपूर्वी याच ठिकाणच्या देवराम शंकर लोंढे यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यावर बिबट्याने हल्ला केला होता. परिसरात अनेक बिबट्यांचा वावर नियमित आढळून येत आहे, अनेकांना त्याचा वावर जाणवतो तर दर्शन सुद्धा होते.
ज्या ठिकाणी बछडे सापडले, त्या ठिकाणी नागरिकांनी वावर टाळून सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. पिल्ले दिसून न आल्यास बिबट्या मादी आणखी आक्रमक होऊन हल्ला करू शकते. त्यामुळे दक्षता घेण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारे हल्ले होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
महत्वाच्या बातम्या;
पुन्हा तोच तमाशा..!! तीन महिन्याची मुदत संपल्यावर पुन्हा शेतकऱ्याची वीज तोडणार?
सामाईक हिस्सा, स्वतःचे क्षेत्र, एकट्याला मोबदला नको; महामार्गाचे पैसे आल्याने घराघरात लागली भांडणे..
कारखानदारांवर टीका करू नका, अतिरिक्त उसावर शेतकऱ्यांनीच आहे चूक? वाचा खरी कारणे..
Share your comments