जसे उसाला एफआरपी मिळते त्याप्रमाणे दुधाला देखील येणाऱ्या उत्पादन खर्चावर आधारित रास्त भावाची हमी मिळावी तसेच उसाप्रमाणे दुधाला एफ आर पी चे संरक्षण मिळावे
त्यासोबतच दूध व त्यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांच्या निर्मितीमध्ये तयार होणाऱ्या नफ्यात शेतकरी कुटुंबांना रास्त वाटा मिळावा यासाठी दूध क्षेत्राला रेव्हेनू शेअरिंग धोरण लागू करावे इत्यादी मागण्यांसाठी संपूर्ण देशात संघर्ष व संघटन उभे करण्याचा निश्चय केरळमध्ये कन्नूर येथे संपन्न झालेल्या शेतकरी नेते व कार्यकर्त्यांच्या राष्ट्रीय बैठकीमध्ये देण्यात आले असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.
कन्नूर येथे संपन्न झालेल्या बैठकीतील मुद्दे
विविध प्रकारचे शेतकरी संघटना,कार्यकर्ते, नेते तसेच प्रगतिशील व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून त्या माध्यमातून दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू आहे. आता हा प्रयत्न राज्य स्तरावर न ठेवता संपूर्ण देश स्तरावर सुरू झाला असल्याचे देखील अजित नवले यांनी सांगितले. यासंबंधी सर्व दूध उत्पादक जे राज्य आहेत त्यामधील प्रमुख शेतकरी नेत्यांची दोन दिवसाची कार्यशाळा ही केरळ येथे 14 व 15 मे रोजी आयोजित करण्यात येणार असून या कार्यशाळेच्या माध्यमातूनसंपूर्ण देशात दूध उत्पादकांची एक भक्कम संघटना उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीलाअखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व सरचिटणीस हन्नन मोल्ला यांच्या मदतीने देशभरातील सर्व प्रमुख दूध उत्पादक राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक केरळमधील कन्नूर येथे नऊ एप्रिल रोजी संपन्न झाली.
Share your comments