1. बातम्या

मनाला चटका लावणारी बातमी! ऊसतोड झाली नाही म्हणून अगोदर लावली उसाला आग, नंतर विषारी औषध पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या

यावर्षी अतिरिक्त उसाच्या प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले असून कारखान्यांचा गाळप हंगाम संपण्याच्या तोंडावर आहे तरीसुद्धा बऱ्याच प्रमाणात ऊस शेतामध्ये उभा आहे

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-pudhari

courtesy-pudhari

यावर्षी अतिरिक्त उसाच्या प्रश्नाने  उग्र स्वरूप धारण केले असून कारखान्यांचा गाळप हंगाम संपण्याच्या तोंडावर आहे तरीसुद्धा बऱ्याच प्रमाणात ऊस शेतामध्ये उभा आहे

. या उसाचे कालावधी संपल्याने त्याला तुरे फुटून वजनात घट होण्याची भीती आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची ऊस तोड व्हावे म्हणून धावपळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ऊसतोड झाली नाही म्हणून एका शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अशा प्रकारे आत्महत्या केल्याने  नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर  आल्याने शेतकऱ्यांमध्ये कारखान्यांच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नक्की वाचा:काय सांगता! 'हा' शेतकरी पाच वर्षांपासून करतोय नांगरटीविना शेती; वाचा काय आहे माजरा

 याबाबतची सविस्तर माहिती अशी की अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जोहरापुर येथील शेतकरी जनार्दन सिताराम माने ( वय 70 ) या  शेतकऱ्यांने आपल्या शेतातील ऊस तुटावा म्हणून खूप फेऱ्या मारल्या. परंतु तरीदेखील ऊसाला तोड मिळत नव्हती. अखेर त्यांनी मंगळवारी दुपारी दोन वाजता या प्रकाराला वैतागून स्वतःच्या उसाला हाताने आग लावली व त्या माध्यमातून आलेल्या नैराश्यातून उसाच्या शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नित्यसेवा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले परंतु उपचार सुरू असताना बुधवारी या वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो अतिरिक्त उसाची माहिती 'या' नंबरवर द्या, तरच तोडला जाईल ऊस, सरकारने केले नियोजन..

त्यामुळे या घटनेचे पडसाद आजूबाजूला उठून शेतकऱ्यांमध्ये कारखान्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.  माने यांनी खामगाव येथील आपल्या पावणेतीन एकर क्षेत्रामध्ये असलेल्या उसाला तोड मिळावी म्हणून  कार्यक्षेत्रातील कारखान्यांकडे गेल्या महिन्याभरापासून विनंती करीत होते. प्रत्येक वेळी त्यांना पुढील तारीख दिली जात होती. या सगळ्या प्रकारातून त्यांना नैराश्य आले होते त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

English Summary: farmer sucide due to big problem to extra cane crop cutting so this famer take this step Published on: 07 April 2022, 08:58 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters